आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील विविध भागातील बारा तास वीज गुल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली चार महिन्यांपासून शहरातील वीजपुरवठा खंडित करणा-या जीटीएलच्या कामाचे पितळ रविवारी मध्यरात्रीच्या पावसात उघडे पडले. संततधार पावसाचे पाणी उघड्या डीपी आणि विद्युत वाहिन्यांवर पडल्यामुळे स्पार्किंग होऊन गारखेडा, चिकलठाणा, सिडको, छावणीसह अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आणि नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
बहुतांश भागाचा वीजपुरवठा सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद होता. पावसाचा शिडकावा व वा-याची झुळूक आली तरी बहुतांश भागात दहा ते बारा तास वीज गुल होत आहे. बुधवारी रात्री रिमझिम पाऊस पडला. हवेचा वेग नेहमीसारखाच संथ होता. परंतु तरीही वीजपुरवठा खंडित झाला.

या भागांना फटका : संपूर्ण गारखेडा परिसर, चिकलठाणा, सिडको एन-1 ते एन-5, छावणी, बेगमपुरा, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, सुभाष पेठ, गवळीपुरा, सातारा परिसर, हर्सूल, रामनगर, मुकुंदवाडी, बीड बायपास, उस्मानपुरा, पडेगाव, मीरानगर, शहागंज, राजाबाजार आदी ठिकाणी रात्री 12.30 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा खंडित होता.