आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \"Guardian Minister Kadam In City For Commissioner Transfer

आयुक्त हटाव\'साठी पालकमंत्र्यांचा शहरात तळ, कदम विरुद्ध खा. खैरे संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. खासदार खैरेंना शह देण्यासाठी पालकमंत्री कदम आक्रमक झाले आहेत.

आयुक्त : नियमानुसार काम महानगरपालिकेतीलसत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यथित झालेले महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "मी नियमानुसार काम करतो,' असे सांगून त्यांनी अविश्वास ठरावाबाबत अधिक बोलणेच पसंत केले.
पालकमंत्री : मी लक्ष देणार

आयुक्तप्रकाश महाजनांवरील अविश्वास ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर होण्यासाठी मी लक्ष घातले आहे. त्यासाठी सभेपूर्वी मी दोन दिवस शहरात तळ ठेकून बसणार आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी नगरसेवकांना सांगितले.
आयुक्तहटाव’ नाटकाचा क्लायमॅक्स शुक्रवारपासून सुरू झाला. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आज सर्वसाधारण सभेसाठी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. सायंकाळी पालकमंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेचे सर्व नगरसेवक भाजपचे पदाधिकारी युतीसोबत असणारे बसपचे नगरसेवक यांची बैठक घेत प्रकाश महाजन यांना शासनाकडे परत पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशीच आपण शहरात येणार असून प्रस्ताव मंजूर होईपर्यंत ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरोधात नाराज असलेल्या सत्ताधाऱ्यांनी अखेर अविश्वास प्रस्ताव दाखल केलाच. शिवसेनेतील अंतर्गत वाद भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे आतापर्यंत डळमळीत असलेल्या अविश्वास प्रस्तावाचा विषय काल स्पष्ट झाला. महाजन यांना हटवण्यास विरोध करणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रस्तावाला विरोध केल्यानंतर शिवसेनेत पालकमंत्री कदम विरुद्ध खासदार खैरे असा संघर्ष उभा राहिला होता. काल शिवसेनेच्या मोजक्या बड्या नगरसेवकांना बाजूला ठेवत पालकमंत्री कदम यांनी इतर सर्व नगरसेवकाची ठाकरे यांची भेट घालून दिली. या वेळी ठाकरे यांनी आयुक्त हटावला हिरवा कंदील दिला. त्यानंतर आज सकाळीच अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला.

सायंकाळी पालकमंत्री शहरात आले नंतर त्यांनी महापौरांच्या निवासस्थानी शिवसेनेचे सर्व नगरसेवक भाजपचे पदाधिकारी यांची भेट घेतली. शिवसेनेच्या नगरसेवकांना त्यांनी उद्धव ठाकरे यांचा आदेश पुन्हा सांगितला कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे, अशा सूचनाही दिल्या.

ठाकरे यांच्या आदेशाचे पुरेपूर पालन व्हावे यासाठी आपण १९ २० आॅक्टोबर असे दोन दिवस औरंगाबादेत राहणार आहोत, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात या प्रस्तावाच्या मंजुरीत कसलाही दगाफटका होऊ नये यावर ते नजर ठेवून असणार आहेत.

कदमांच्यासरशीचे अर्थ : कदमविरुद्ध खैरे संघर्षात या वेळी पुन्हा एकदा कदमांनी खैरे यांच्यावर बाजी मारली आहे. या वेळच्या कदमांच्या चालीचे अनेक अर्थ आहेत. ‘मातोश्री’वर आपलेच चालते असे सांगणाऱ्या खैरे यांना या निमित्ताने प्रत्युत्तर मिळाले आहे, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे खासदार खैरे यांचे शक्तिस्थान असणाऱ्या मनपावर आता मछली खडक नव्हे तर सुभेदारीचा शब्द चालतो हे समोर आले आहे. या संघर्षातून खैरे समर्थकांना आगामी काळात मनपात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

आयुक्तम्हणतात, मी नियमानुसार काम करतो :या अविश्वास प्रस्तावाबाबत आयुक्त प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देताना "मी नियमानुसारच काम करतो' एवढेच सांगितले.

एमआयएम चार हात दूर
मागीलवेळी एमआयएमने आम्ही आयुक्तांच्या विरोधात प्रस्ताव आणतो, असे सांगत पुढाकार घेतला होता. पण भाजपने अवसानघात केल्याने तो बारगळला होता. त्या वेळी शिवसेनाही आक्रमक मूडमध्ये होती. आता भाजपने पुढाकार घेतला आहे शिवसेनेने ना ना करीत शेवटी आयुक्त हटावला पाठिंबा दिला आहे. पण त्यामुळे एमआयएम दुखावली असून त्यांनी आयुक्तांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अखेर प्रस्ताव आला
आधीमित्रपक्षाबाबत अविश्वास नंतर पक्षांतर्गत कुरबुरी यामुळे अविश्वास प्रस्ताव येतो की नाही याची खात्री नव्हती. पण काल मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने प्रस्ताव आणला तर शिवसेनेचा पाठिंबा राहील असे जाहीर करताच आज भाजपच्या वतीने प्रस्ताव दाखल करण्यात आला. पुरवणी विषयपत्रिकेत २० कलमी आरोपांचा उल्लेख करीत मनपा अधिनियम कलम ३६ (३) नुसार आयुक्तांना शासनाकडे परत पाठवावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रमोद राठोड, राजेंद्र जंजाळ, भगवान घडामोडे, गजानन बारवाल यांच्या सूचक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत, तर दिलीप थोरात राजू वैद्य हे अनुमोदक आहेत.

आयुक्त हटाव मोहिमेसंदर्भात पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी सायंकाळी महापौर बंगल्यात नगरसेवकांची बैठक घेतली. या वेळी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर त्र्यंबक तुपे यांची उपस्थिती होती.

काँग्रेस राष्ट्रवादीही चुप्पी
एमआयएमशिवायकाँग्रेस राष्ट्रवादीही या ठरावाच्या बाजूने नाहीत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी या विषयावर शिवसेनेलाच घेरले आहे. महाजन यांच्यासारखा मराठी माणूस आयुक्त असताना त्यांच्या निवृत्तीला अवघे दोन महिने बाकी असताना अविश्वास प्रस्ताव अाणणे चुकीचे आहे. खरे तर सत्ताधारी आठ-आठ महिने बजेट करू शकत नाहीत, मग आयुक्त काम कसे करतील? आधी आपला कारभार सुधारावा. काँग्रेस , राष्ट्रवादीने या प्रस्तावाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हे करताना प्रथमच हे दोन्ही पक्ष एमआयएमच्या साथीला असणार आहेत.