आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री कदम-खासदार खैरे यांचा पुन्हा गळ्यात गळा, झाले-गेले विसरून पुन्हा एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त रामदास कदम आणि खासदार खैरे यांनी बुलेट सवारी केली. छाया : मनोज पराती - Divya Marathi
वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त रामदास कदम आणि खासदार खैरे यांनी बुलेट सवारी केली. छाया : मनोज पराती
औरंगाबाद - पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि जिल्ह्यावर माझीच पकड राहील याची कायम खबरदारी घेणारे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलेच वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे मधल्या काळात कदम यांच्या जिल्हा दौऱ्या दरम्यान खैरे दूर राहत असत. मात्र, शनिवारी वेगळे चित्र दिसले आणि तमाम शिवसैनिक चकित झाले. कदम खैरे शनिवारी जाहीर कार्यक्रमांत एकत्र तर दिसलेच, शिवाय त्यांनी खुललेल्या चेहऱ्याने एकमेकांशी संवाद साधला. त्यामुळे ‘गळ्यात गळा’ घालण्याची ही जादू झालीच कशी, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचबरोबर हे सख्य किती दिवस राहील, याचीही उत्सुकता असल्याचे अनेकांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणून दाखल झाल्यानंतर कदम यांनी अल्पावधीतच संघटनेवर आपली पकड निर्माण केली. त्याचबरोबर येथील स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासमवेत एकत्र आले. परिणामी खैरे एकटे पडल्याचे चित्र होते. ‘यापुढे खैरे नव्हे, तर मीच साहेब’ असे वक्तव्य कदम यांनी केल्यानंतर दोघांतील दरी चांगलीच वाढली. त्यामुळे जेव्हा जेव्हा कदम हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत तेव्हा खैरे तेथे दिसत नव्हते. निमंत्रण असूनही अनेक वेळा खैरे यांनी कदम त्यांच्या कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने मदत वाटप करण्यात आली. याच्या नियोजनापासूनही खैरे दूर होते. त्यांना मुद्दाम दूर ठेवण्यात येत असल्याची चर्चा होती. शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी जेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तेव्हाच खैरेसमवेत होते. मात्र, त्यानंतर फक्त पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यास खैरे यांनी मुद्दाम टाळले होते. त्यामुळे दोघांतील दरी वाढतच चालली होती. मधला काही काळ तर ते दोघे एकमेकांशी साधे बोलतही नव्हते. वृत्तपत्रांत दोघांच्या वादाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा त्या कदम यांनीच दिल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. त्यामुळे एकाच संघटनेतील हे दोन शिलेदार भविष्यात एकत्र येतील, अशी शक्यता कोणालाही वाटत नव्हती.

पुढे वाचा.. कदमही एकटे पडल्याने चमत्कार?