आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Reservation Is Shown In Black And Flags

आरक्षणासाठी पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-मातंग समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेले लहुजी सेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये पोलिस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना अटक केली.
परेडचा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात असताना स्काऊट गाइडचे पथक मैदानातून बाहेर पडत होते. या वेळी मैदानाजवळील दग्र्याच्या शेजारी असलेल्या गेटमधून लहुजी सेनेचे कार्यकर्ते रतन चंदन शेलार (40), प्रमोद रामहरी कांबळे (19), संतोष शंकरराव पवार (30), आनंद बाबुराव चांदणे (32) आणि प्रकाश विठ्ठल शेजवळ (25) हे आत शिरले. हातात काळे झेंडे घेऊन अचानक मैदानात शिरलेल्या या कार्यकर्त्यांना पाहून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना पकडले. शासकीय कामात अडथळा, राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करून संविधानाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कर