आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरचा करार बदलला; हर्षदीप कांबळेंची चौकशी, पालकमंत्री कदम यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनी योजनेचा करार बदलल्याप्रकरणी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.

‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित ‘गप्पा डावपेचांच्या’ या सदरात त्यांनी गुरुवारी (१६ एप्रिल) संपादकीय सहकाऱ्यांशी मनपा निवडणूक आणि शहरातील समस्या, युतीची प्रचार यंत्रणा आदींबाबत मनमोकळी चर्चा केली. अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. समांतरच्या करारात अनेक अटी बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा करार मला व्यक्तीश: मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कदम म्हणाले, करारातील अटी परस्पर बदलण्यात आल्या आहेत. त्यामागे नेमके कोण आहे, अटी का बदलल्या, हे सर्वांसमोर येणे आवश्यकच आहे. त्यामुळे डॉ. कांबळे यांची चौकशी करण्यात येणार आहे. आचारसंहितेचा अंमल संपल्यावर तातडीने चौकशीला वेग दिला जाईल. समांतर रद्द करून टाकू, असे मी कधीच म्हणालो नव्हतो. काम तातडीने सुरू झाले नाही तर योजनाच रद्द करू, असे माझे म्हणणे होते. त्यानुसार मी पावले उचलली. उद्धव ठाकरे यांनी समांतरच्या कंपनी मालकाला बोलावून सूचना दिल्या.