आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gudhi Padawa News In Marathi, Marathi New Year Celebration, Divya Marathi

ढोल-ताशांच्या गजरात गुढय़ा उभारून समाजाला दिला मानवतेचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लायन्स क्लब डायमंड व कुलस्वामिनी मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ढोल-ताशांच्या गजरात अकरा फुटांच्या सप्तरंग गुढय़ा उभारण्यात आल्या. सात रंगांतून शांतता, समृद्धी, शौर्य, त्यागाचा संदेश देण्यात आला आहे. सप्तरंगी गुढय़ा उभारण्याचा आगळावेगळा प्रकार सर्वांच्याच आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.
लायन्स क्लब डायमंडतर्फे दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. गतवर्षीही शहरात सर्वांत उंच गुढी उभारून लायन्स क्लब डायमंडने सर्वांचे लक्ष वेधले होते. यंदा प्रेमाचे प्रतीक लाल, शौर्याचे प्रतीक नारंगी, मैत्रीचे प्रतीक पिवळा, समृद्धीचे प्रतीक हिरवा, समानतेचे प्रतीक निळा, शांततेचे प्रतीक पांढरा आणि त्यागाचे प्रतीक जांभळा अशा सप्तरंग गढय़ांची उभारणी करून समाजाला संदेश दिला आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांना साखरेच्या गाठय़ा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आल्या. विलास कोरडे, अलका कोरडे, धीरज सावजी, प्रशांत मिरकुटे, अशोक कुलकर्णी, वैभव कोरडे यांनी गुढी उभारण्यासाठी प्रयत्न केले.