आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहुण्या खासदार झाल्या नाराज, प्राणिसंग्रहालयाची दैना पाहून मनपावर ओढले कोरडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या पिंज-यासमोरील खंदकात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याने अस्वस्थ झालेल्या बिहारच्या खासदार वीणा देवी यांनी मनपाच्या कारभारावर कोरडे ओढले. किती दुर्गंधी येत आहे, आपण पाच मिनिटेही उभे राहू शकत नाही, तिथे वाघ कसे राहतील, असा सवाल त्यांनी केला.

संसदीय कागदपत्र समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे, सदस्य व बिहारमधील मुंगेरच्या खासदार वीणा देवी, प्राणी संग्रहालय संचालनालयाचे शिवकुमारन, सहायक महासंचालक इंदर धमिजा यांनी सोमवारी सिद्धार्थ उद्यानाला भेट दिली. प्राणिसंग्रहालयाची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. या वेळी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त प्रकाश महाजन व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डाॅ. बी. एस. नाईकवाडे उपस्थित होते. खैरे यांनी या प्राणिसंग्रहालयाबाबत माहिती दिली व त्याचे १०० एकर जागेत मिटमिटा येथे स्थलांतर करून तेथे सफारी पार्क उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. केंद्रीय प्राणिसंग्रहालय संचालनालयाने त्याला निधी द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. यानंतर या पाहुण्यांनी संग्रहालयाची पाहणी केली. पिवळ्या वाघाच्या पिंज-याबाहेर असलेल्या खंदकात साचलेल्या हिरव्या-निळ्या पाण्याकडे नजर फेकत पाहुण्यांनी दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावला. हे तुम्ही साफ करायला हवे होते, असे खा. वीणा देवी यांनी डाॅ. नाईकवाडे यांना सुनावले. आपण इथे पाच मिनिटेही उभे राहू शकत नाही, मग वाघ कसे राहतील, असा रोकडा सवाल त्यांनी केला. पांढ-या वाघाच्या पिंज-यासमोरही असाच प्रकार पाहून त्यांनी हे प्रकार बंद करा, त्याचा प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे सांगितले. हत्तींच्या जागेकडे जाताना त्यांनी मगरीच्या हौदाचीही पाहणी करून तेथेही नाराजी व्यक्त केली. सायंकाळी या समितीच्या बैठकीत महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्राणिसंग्रहालयासाठी ३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली.
छायाचित्र: केंद्रीय पथकाने सिद्धार्थ उद्यानाची पाहणी केली. याप्रसंगी खा. खैरे, आयुक्त महाजन आदी.
बातम्या आणखी आहेत...