आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातील संशोधक होणार विद्यापीठाचे गाइड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी पेट (पीएचडी पूर्व परीक्षा)२८ सप्टेंबर रोजी होणार आहे. यंदा ५५ विषयांसाठी ९ हजार २१७ विद्यार्थी परीक्षा देणार असून शहरातील १७ महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठाच्या नवीन निर्णयानुसार देशभरातील संशोधक आता संशोधकांसाठी गाइड असणार आहे.

या वेळी विद्यापीठाने परीक्षा प्रक्रियेत बदल केले आहेत. यात प्रामुख्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी मिळणार आहे. निकाल लागल्यानंतर आदर्श उत्तरपत्रिकेची प्रत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली याची माहिती घरबसल्या मिळेल. त्यामुळे पुनर्मूल्यांकन करणे सोपे जाईल. याशिवाय ऑनलाइन हॉलतिकिटाचे वाटप होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत काही अडचणी असल्यास ०२४०- २४०३१५२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत पेट परीक्षा पास झाल्यानंतर संशोधन करण्याची मर्यादा एक वर्षापर्यंत होती. आता मात्र परीक्षा पास झाल्यानंतर संशोधनासाठी पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. परीक्षेनंतर दहा दिवसांत निकाल लागणार असून पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. या वेळी कुलसचिव धनराज माने, डॉ. के. व्ही. काळे, प्रा. सुरेश गायकवाड, डॉ. सचिन देशमुख, माधव सोनटक्के, डॉ. सय्यद अझरुद्दीन यांची उपस्थिती होती.

देशभरातील संशोधक गाइड : विद्यापीठाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार देशभरातील तज्ज्ञांची निवड विद्यापीठ करणार असून प्रत्येक गाइडसाठी दोन संशोधक विद्यार्थी असणार आहेत. यामुळे देशभरातील अभ्यासाचे मार्गदर्शन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मिळेल.
शहरातील परीक्षा केंद्रे
महाविद्यालयाचे नाव क्षमता परीक्षार्थी
देवगिरी महाविद्यालय १००८ १०००
विवेकानंद महाविद्यालय ९०० ९०१
मौलाना आझाद ८१६ ८०८
सरस्वती भुवन ७६० ७५३
रफिक झकेरिया ७२० ६४४
देवगिरी इंजिनिअरिंग ७२० ९७८
जेएनईसी ७२० ६७०
एसबी सायन्स कॉलेज ४८० ४४९
पहाडे विधी महाविद्यालय ४५६ ४२३
महिला महाविद्यालय ४०८ ३९८
वसंतराव नाईक कॉलेज ३९० ३६५
पीईएस अभियांत्रिकी ९८४ ३६०
आंबेडकर आर्ट अँड सायन्स २९८ २९०
वाय. बी. चव्हाण फार्मसी २६० २५९
मिलेनियम इन्स्टिट्यूट २५४ २३६
एमआयटी बीटेक ५०० ४९४
एमआयटी अभियांित्रकी ५०० ४८९