आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रचार पर्यटनाचा- गुजरातमधील पर्यटनस्थळांचे पर्यटन राजधानीत ब्रँडिंग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या दोन वर्षांत गुजरातमध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या चार पटींनी वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी गुजरातला 60 लाख पर्यटक भेट देत होते. आता ही संख्या तीन कोटींवर गेली आहे. गुजरातमधील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी स्वतंत्र 1200 कोटींचे बजेट आखण्यात आले आहे, अशी माहिती गुजरात टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कमलेश पटेल यांनी दिली. इंडिया नॅशनल ट्रॅव्हल्स प्रदर्शनाच्या निमित्ताने गुजरात पर्यटन विभागाने आपले जोरदार ब्रँडिंग सुरू केले आहे. शुक्रवार, 9 ऑगस्टपासून एपीआय कॉर्नर येथील सागर लॉनमध्ये या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे.

गणेशोत्सव, दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्यांत देशात किंवा परदेशात टूर करण्याच्या नियोजनासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. सकाळी साडेअकरा ते रात्री साडेसातपर्यंत नागरिकांसाठी खुले आहे. या प्रदर्शनात भारतीय पर्यटन विभागासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, मलेशिया यासह 35 खासगी कंपन्यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या दालनावर विविध राज्यांतील पर्यटनस्थळांची माहिती आणि टूर पॅकेजेस उपलब्ध आहेत, अशी माहिती आयआयटीचे (इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स) संचालक अनुराग गुप्ता यांनी दिली. या प्रदर्शनाला औरंगाबादकरांनी प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे काय?
शेजारच्या गुजरात राज्यात सोमनाथ, द्वारका, अंबाजी, सापुतारा, गीरचे अभयारण्य या पर्यटनस्थळांचा विकास करून देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. यासाठी औरंगाबादमध्ये नवरात्रीदरम्यान रोड शोचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. या तुलनेत महाराष्ट्रात पर्यटनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. चार दिवसांपूर्वीच स्कॉटलंड येथील पर्यटक शहरात खड्डय़ांत पडून जखमी झाला होता. राज्याच्या पर्यटन राजधानीच्या अशा अवस्थेमुळे पर्यटक शहरात आकर्षित होतील काय, हा खरा प्रश्न आहे.