औरंगाबाद - जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी तथा राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे यांनी गुरुवारी फेटाळला. जळगाव महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुल घोटाळ्यातील भ्रष्टाचारप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र सहा वर्षे यासंबंधी कारवाईच झाली नाही. उपरोक्त गुन्ह्यात २५ एप्रिल २०१२ रोजी दोषारोपपत्र दाखल झाले.
साक्ष नोंदविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर २१ मे २०१२ रोजी देवकर यांना अटक करण्यात आली. त्याच दिवशी विशेष न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. ६ ऑगस्ट २०१२ रोजी औरंगाबाद खंडपीठाने देवकरांचा जामीन नाकारला.सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला व हे प्रकरण धुळ्यातील िवशेष न्यायालयात हस्तांतरीत करण्यात आले.
औरंगाबाद खंडपीठात आव्हान िदले हाेते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरला सुनावणी झाली. गुरुवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
या प्रकरणात देवकरांकडून अॅड. जॉयदीप चॅटर्जी तर शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी बाजू मांडली.