आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलमंडी, जवाहर कॉलनी होणार "स्मार्ट', स्मार्ट सिटीसाठी मनपाचा आराखडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचे रंगरूप नागरी सुविधांचा दर्जा पालटणार असून त्यासाठी नूतनीकरण, पुनर्विकास नवीन वसाहतीच्या माध्यमातून मोठे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. पुनर्विकासात शहरातील गुलमंडी, शहागंज, महावीर चौक रंगारगल्लीसारख्या अति गजबजलेल्या भागांची पूर्णपणे नव्याने रचना करण्यात येणार असून तेथे नवीन, टोलेजंग व्यवसायपूरक आणि नागरिकांना सुविधा देणारा परिसर विकसित होणार आहे. मुंबईतील भेंडीबाजार प्रोजेक्टच्या धर्तीवर हा प्रकल्प असणार आहे. दुसरीकडे जवाहर कॉलनी, सिंधी कॉलनी, भानुदास नगर आदी भागातील नागरिकांच्या सुविधेवर भर देणाऱ्या नूतनीकरणाची कामे केली जाणार आहेत.
या प्रकल्पात औरंगाबादेत नेमके काय होणार याचा अंतिम आराखडा तयार करण्यासाठी पीएमसीची निवड करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या कामांची विभागणी नूतनीकरण, पुनर्विकास, नवीन वसाहत निर्मिती शहरव्यापी योजना अशा चार विभागांत करण्यात आली आहे. मनपाने प्रस्ताव सादर करताना कोणत्या भागात विकास करायचा आहे याचे सादरीकरण केले. त्यात गुलमंडी, शहागंज, महावीर चौक रंगारगल्ली या भागांत अधिक चांगल्या नागरी सुविधांसह सुसह्य सेवा देण्यासाठी पुनर्विकास केला जाणार आहे. याचाच अर्थ कालांतराने पार्किंग, मनोरंजनाच्या सुविधांयुक्त गुलमंडी होऊ शकेल. त्यासाठी हा जुना भाग नव्याने विकसित करावा लागेल. उपलब्ध जागेत अधिक एफएसआयचा वापर करून टोलेजंग इमारती उभारल्या जातील. अर्थात यासाठी त्या भागातील नागरिकांनी होकार दिल्यावर हे प्रकल्प सुरू होणार आहेत. पुनर्विकासाचे काम पाच वर्षांत पूर्ण होईल.
भेंडीबाजार मॉडेल वापरणार .
एक नजर निधी टाइमटेबलवर
५५० कोटी दोनते तीन मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी
५० कोटी ई-गव्हर्नन्स आॅनलाइन नागरी सेवांसाठी
१०० कोटी नवीनवसाहतींच्या निर्मितीत खासगी गुंतवणूक
५० कोटी क्षमतानिर्मिती, नागरिकांचा सहभाग प्रकल्प प्रारंभासाठी
१००कोटी :पुनर्विकास खासगी गुंतवणूक
१५० कोटी: नूतनीकरणासाठी

दुसरा टप्पा : ते १० वर्षांचा
पहिला टप्पा : वर्षांचा

आखीव- रेखीव वसाहती
एकीकडे शहराची उद्यमशीलता उलाढाल वाढावी या हेतूने हे प्रकल्प राहतील, तर निवासी भागांतही अधिकाधिक नागरी सुविधांसाठी नूतनीकरणातून प्रकल्प राबवले जातील. वीज, पाणी, रस्त्यांच्या सुविधेसोबतच व्यापारी प्रतिष्ठाने नागरिकांना अधिक चांगला परिसर राहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. महापालिकेने आपल्या प्रस्तावात विकसित अशा वसाहतींचा समावेश केला असला तरी गरजेनुसार त्यात भर पडणारच आहे. नवीन वसाहतींच्या निर्मितीतून आखीव- रेखीव अत्याधुनिक वसाहतींची निर्मिती होईल.

कोण कसे करणार ?
{पाच वर्षांत अंमलबजावणी
{ एसपीव्ही हाताळणार प्रकल्प
{केंद्र, राज्य मनपाचा आर्थिक सहभाग
{ प्रकल्पासाठी स्पर्धेतून निवड करणार

काय करणार ?
{शिक्षण,आरोग्य आणि मनोरंजनासाठी अत्युच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती
{बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था
{ व्यापारपूरक व्यवस्था, कौशल्य विकास केंद्रे
{ याशिवाय पुनर्विकासाची सर्व कामे येथेही होतील

कुठे होणार?
{मोकळ्याभूखंडांवर
{किमान २५० एकरांची एक टाऊनशिप

कुठे होणार?
{सध्या अस्तित्वातील गजबजलेले भाग
{प्रकल्पाचा आकार किमान ५० एकरांचा

काय करणार ?
{अधिकाधिक बांधकामयोग्य जागा आणि कमी जागा व्यापणारी बांधकामे
{हरित ऊर्जापूरक इमारती
{रुंद रस्ते, करमणुकीची ठिकाणे, खुल्या जागा
{ याशिवाय नूतनीकरणात येणारी कामे असतीलच

कोण कसे करणार?
{पाच वर्षांत अंमलबजावणी
{ एसपीव्हीकडे असतील सूत्रे
{केंद्र, राज्य मनपाचाही सहभाग
{ स्पर्धेतून निवडणार प्रकल्प विकसक

कुठे होणार?
{सध्याच्या विकसित भागांत
{किमान ५०० एकरांचा आकार असावा

काय करणार ?
{घनद्रवरूप कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आणणार
{उत्तम दर्जाचा वीज पाणीपुरवठा, स्मार्ट मीटरिंग
{हायस्पीड आणि अधिक बँड विड्थची संपर्क यंत्रणा
{सर्व सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्हीची निगराणी यंत्रणा
{एलईडी दिवे, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा पार्किंग व्यवस्था
{पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्ते

कोण कसे करणार?
{तीन वर्षांत पूर्ण करावे लागणार
{ केंद्र, राज्य मनपा यांचा सहभाग असलेली एसपीव्ही प्रकल्प हाताळणार
{ ही कामे करून घेण्यासाठी स्पर्धेतून संस्था निवडणार
(नूतनीकरण पुनर्विकासाठीची वसाहतींची ही यादी मनपाने तयार केलेल्या सादरीकरणातील आहे. त्यात गरजेनुसार सविस्तर अभ्यासानंतर शहरातील इतर वसाहतींचा समावेश होऊ शकतो)
नूतनीकरणासाठी कालावधी : वर्षे
पुनर्विकासासाठी कालावधी : वर्षे
नवीन वसाहत निर्मितीसाठी : ते १० वर्षे
संपूर्ण प्रकल्पाचा कालावधी : ते १० वर्षे

पुनर्विकास (रिडेव्हल्पमंेट)
{गुलमंडी
{शहागंज
{महावीर चौक
{रंगारगल्ली

यात संपूर्ण शहराला उपयोगी पडतील असे दोन ते तीन प्रमुख पायाभूत सुविधांचे प्रकल्प
{हिमायतबाग
{मुकुंदवाडी
{पैठण रोडवरील गोल्डन सिटी (गरजेनुसार यादीत बदल शक्य)
नूतनीकरण (रिट्रोफिटिंग)
{जवाहर काॅलनी
{शिवशंकर काॅलनी
{सिंधी काॅलनी
{भानुदासनगर
{स्वानंदनगर
{बालाजीनगर
{विष्णुनगर

आयुक्त हैदराबादेत
मनपा आयुक्त प्रकाश महाजन हैदराबादेत दोन दिवसांच्या स्मार्ट सिटी कार्यशाळेसाठी रवाना झाले. नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीतील ही तिसरी कार्यशाळा असून त्यात स्मार्ट सिटीची अंमलबजावणी पुनर्विकासाच्या माध्यमातून काम करताना काय अपेक्षित आहे यावर ऊहापोह होणार आहे.