आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - गल्फ ऑइलतर्फे आर्मी मैदान, रेल्वेस्टेशन रोड येथे गल्फ डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिप (दुचाकी शर्यत) स्पर्धाचा थरार रविवार, 3 जून रोजी सकाळी 8 वाजता आर्मी मैदान, रेल्वेस्टेशन रोड येथे पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय पातळीवरील एफएमएससीआय चॅम्पियनशिप स्पध्रेच्या पाच फेर्यांपैकी दुसरी फेरी औरंगाबाद येथे होत आहे. बंगळुरू येथील स्पध्रेतील विजेता व्ही.एस. नरेश (बंगळुरू), नाशिकचा गणेश लोखंडे आणि यजमान औरंगाबादचा फेरोज खान हे स्पध्रेचे आकर्षण आहे. विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभागी होणार्या खेळाडूंचा 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा एफएमएससीआयतर्फे काढण्यात येतो.
स्पध्रेत मुंबई, बंगळुरू, गोवा, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, भोपाळ इ. येथील नामवंत रायडर्ससह 180 खेळाडूंनी प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धा विविध 14 गटांत होणार असून 9 गटांत राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. इतर 5 गटांत यजमान महाराष्ट्राच्या गटासह स्थानिक औरंगाबाद गटात विविध क्रीडा प्रकारात स्पर्धा होईल. स्पर्धा औरंगाबाद रेसिंग ऑर्गनायझेशन व रोड्ज रेसिंग असोसिएशन आणि र्शीकांत काराणी, अली नवाज, चंद्रकांत सातपुते, हरीश ब्रिजवाणीच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
आर्मी मैदानावर होत असलेल्या या स्पध्रेला भगवानदास तिबडीवाला यांनी विरोध दर्शवला आहे. संबंधित जागा आपल्या मालकीची आहे. त्यावर स्पर्धा घेण्यासाठी माझी परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ यांना एका दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अशी असेल स्पर्धा - एफ 1 रेसिंगशी साधम्र्य असणारी डर्ट ट्रॅक ही मोटारसायकल्ससाठी असलेली स्पर्धा आहे. यात चालक अत्यंत वेगाने वेडीवाकडी वळणे असलेल्या चिखलातून गाडी चालवतात. स्पर्धकाला आपल्या क्रीडा प्रकारानुसार फेर्या माराव्या लागतात. यात तोल सांभाळत गाडीचा वेग आणि नियंत्रण राखावे लागते.
नाशिकचा यश पवार सर्वात छोटा रायडर - स्पध्रेतील सर्वात छोटा केवळ 12 वर्षांचा हा रायडर आहे. इयत्ता 8 वीत शिक्षण घेत आहे. फॉरेन ग्रुप अ मध्ये आपले कौशल्य दाखवणार आहे. भोपाल येथे झालेल्या स्पध्रेत 8 क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. यंदा जोरदार तयारी झाली असून विजेतेपद पटकावणार असा त्याने निश्चिय केला आहे. प्रथम काका आणि नंतर वडील हे रायडिंग करत होते त्यांचे पाहून त्याने वयाच्या 8 व्या वर्षी सराव करण्यास सुरुवात केली आहे. स्पध्रेत होडा सीआर 85 सीसी गाडी तो वापरणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.