आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामे टाळण्यासाठीच अधिकाऱ्यांकडून बंदूकधारी सुरक्षारक्षकांचा ‘कर्फ्यू’; नगरसेवक संतप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सर्वसामान्यांचा राबता असणाऱ्या महापालिकेत बंदूकधारी सुरक्षारक्षकांकडून एकदा नव्हे तर तब्बल तीन-तीन वेळा अाेळखपत्राची मागणी करून नागरिकांच्या अडवणुकीचे काम सुरू असून, कामे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनीच उभारलेली तटबंदी असल्याचा अाक्षेप घेत स्थायी समिती सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी सुरक्षारक्षकांच्या पात्रतेबाबतच शंका व्यक्त करीत पाेलिस भरतीतून अपात्र ठरलेल्यांचा ‘कर्फ्य’ लवकर हटवला नाही तर कठाेर भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला. खुद्द सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी याची गंभीर दखल घेत अायुक्तांचे दालन साेडून अन्यत्र असलेले बंदूकधारी सुरक्षारक्षक हटवावे, तसेच मुख्यालयातील संख्याही कमी करावी, असे अादेश दिले. 


महापालिकेत अस्तित्वातील कर्मचाऱ्यांचे महत्त्व कमी करून खासगीकरणाद्वारे ठेके देण्यासाठी धडपड सुरू असून सल्लागार किंवा ठेकेदार या दाेनच बाबी प्रशासनाला दिसत असल्याचा अाक्षेप अाहे. त्यातूनच अामदार बच्चू कडू अायुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात वाद झाल्यानंतर पालिका सुरक्षेचा मुद्दा एेरणीवर अाला या कामासाठी खासगीकरणातून महाराष्ट्र गृहरक्षक दलाचे सुरक्षारक्षक नेमण्यात अाले. दरम्यान, संबंधित संस्था निमशासकीय असल्यामुळे येथे ठेकेदाराचा थेट संबंध नसला तरी, त्यावर हाेणारा खर्च वादात हाेता. मुळात, महापालिकेचे स्वत:चे सुरक्षारक्षक असून गरज असेल तर त्यांना प्रशिक्षण देऊन बंदुकी देण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात अाली, मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत अायुक्तांचा प्रस्ताव असल्याचे कारण देत स्थायी समितीकडून ४५ सुरक्षारक्षक नियुक्तीस मंजुरी घेतली. त्यावेळी सभापती गांगुर्डे यांनी महापालिका मुख्यालयात सर्वसामान्यांचा राबता असल्यामुळे अायुक्तांच्या सुरक्षेसाठी एक बंदूकधारी साेडून अन्य काेठेही परवानगी देऊ नये असे स्पष्ट केले, मात्र त्यानंतरही पालिकेत साेमवारपासून २५ सुरक्षारक्षकांना तैनात करताना त्यात सहा बंदूकधारी दिले. त्यांच्याकडून पालिकेचे मुख्य प्रवेशद्वार ते अात येण्यापर्यंत तीन टप्प्यात अाेळखपत्रासह कसून तपासणी सुरू झाल्याने त्यातून कामासाठी येणाऱ्यांना माघारी जावे लागल्याने नगरसेवक संतप्त झाले हाेते. 


अाेळखपत्रापेक्षाही सुरक्षारक्षकांची वर्तणूक काेणी प्रतिकार केल्यास घाेळक्याने अंगावर जाण्याच्या पद्धतीने स्थायीच्या सभेत सदस्य अाक्रमक झाले. प्रवीण तिदमे यांनी स्थायीने अायुक्तांकडे एकमेव बंदूकधारी देण्याचे स्पष्ट अादेश दिले असताना ठरावाची अंमलबजावणी का केली नाही, असा सवाल केला. सूर्यकांत लवटे यांनी ‘पालिकेला पाेलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून ही तटबंदी नेमकी काेणासाठी’, असा सवाल केला. डी. जी. सूर्यवंशी यांनी कामचुकार अधिकाऱ्यांनी सामान्यांकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठी ही याेजना तर अाखली नाही ना? असा सवाल केला. 


जलशुद्धीकरण केंद्रासह महत्त्वाची ठिकाणे वाऱ्यावर 
पालिकामुख्यालयात २५ पेक्षा अधिक सुरक्षारक्षक तैनात करताना जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर धरण, जलकुंभाच्या सुरक्षेबाबत कानाडाेळा केल्याचे उघड झाले. यासंदर्भात सदस्यांनी जाब विचारल्यानंतर प्रशासनाने यापुढे २० सुरक्षारक्षक उपलब्ध हाेणार असून त्यांची नियुक्ती हाेईल, असे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...