आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकरने पाणीपुरवठा: गुंठेवारीतील चार लाख लोक मोजतात दुप्पट दाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुंठेवारी भागात राहणाऱ्या शहरातील चार लाखांवर लोकसंख्येला पाण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. या भागाची तहान भागवण्यासाठी मनपा टँकरने पाणीपुरवठा करते. मात्र, अन्य भागांच्या तुलनेत अर्धेच पाणी मिळत असताना त्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. तथापि, अधिक पैसे मोजूनही या वसाहतींना नियमित आणि वेळेत पाणी मिळण्याची शाश्वती नाही.
 
शहराची लोकसंख्या १२.५ लाख आहे. यातील चार लाख लोक गुंठेवारी भागात राहतात. मनपाच्या नोंदीनुसार शहरात एकूण १४३ गुंठेवारी वसाहती आहेत. या ठिकाणी लोकसंख्येची घनता अधिक आहे. यापैकी जवळपास अर्ध्या वसाहतीत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तर उर्वरित वसाहतीतील सुमारे २.५ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वर्षातील १२ महिने आणि ३६५ दिवस त्यांना पाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
 
टँकरने पाणीपुरवठा
गुंठेवारीवसाहतीत एक दिवसआड याप्रमाणे वर्षाला १८० दिवस टँकरने पाणीपुरवठा केला जातो. नागरिक घराबाहेर त्यांच्या गरजेनुसार २०० लिटर क्षमतेचे एक किंवा दोन ड्रम ठेवतात. त्यांना मनपा कार्यालयात महिन्यांचे आगाऊ पैसे भरावे लागतात. याप्रमाणे वर्षाचे ४.५ ते हजार रुपये लागतात. या बदल्यात दोन ड्रममधील ४०० लिटर पाण्याप्रमाणे वर्षाकाठी ८० हजार लिटर पाणी मिळते. दुसरीकडे नियमित वसाहतींना दोन दिवस आडप्रमाणे १२१ दिवस पाणीपुरवठा होतो.

एका दिवशी सरासरी १००० लिटर पाणी येते. म्हणजेच १२१ दिवसांत त्यांना लाख ८२ हजार लिटर पाणी मिळते. यासाठीही ४००० ते ४२०० रुपये पाणीपट्टी भरावी लागते. म्हणजेच गुंठेवारी भागात ५००० रुपये भरून ८० हजार लिटर पाणी मिळते, तर नियमित वसाहतीत ४२०० रुपयांत दुपटीपेक्षा अधिक लाख ८२ हजार लिटर पाणी मिळते. अधिक पैसे मोजूनही वेळेवर पाणीपुरवठा होईल याची काही खात्री नसते. वर्षभर हीच स्थिती कायम राहते. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वसाहतीतील पुरवठ्याची जबाबदारी मनपाची आहे.
 
बातम्या आणखी आहेत...