आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंठेवारीत २००१ पूर्वी खरेदी केलेल्या प्लॉटवरील बांधकामे नियमित होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील ११८ गुंठेवारी भागांत २००१ पूर्वी ज्या प्लॉटची खरेदी-विक्री करण्यात आली, मात्र त्यावर २००१ नंतर बांधकाम करण्यात आले, अशा मालमत्ता गुंठेवारीत नियमित करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नागरिकांना दिले.
पुंडलिकनगर, गजानननगर भागात बुधवारी सकाळी सुधाकर नाईक शाळेत गुंठेवारी भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्रेकरांनी बैठक घेतली. मोठ्या प्रमाणात गुंठेवारी भागात नागरिकांना सुविधा मिळत नसून सुविधा देण्यासाठी मनपाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जास्तीत जास्त नागरिक गुंठेवारी नियमित करून घेणार नाहीत तोपर्यंत या भागांत शासनाच्या नियमानुसार सुविधा देणे अडचणीचे असल्याचे केंद्रेकरांनी सांगितले.

{ज्यांची घरे प्लॉटची खरेदी २००१ पूर्वीची आहेत, ती सहज नियमित होतील. त्याचबरोबर २००१ मध्ये बांधकाम झाले, त्या बांधकामांचा दंड भरूनही ही घरे नियमित करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

{गुंठेवारी नियमित करून घेण्यासाठी सरळ आणि सोपी पद्धत असल्याचे स्पष्ट करून तसा अर्ज नगरसेवकांकडून भरून घेऊन तो मनपात जमा केल्यास लवकरच गुंठेवारी नियमित करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील, असे त्यांनी सांगितले.