आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुनानक जयंती मिरवणुकीतील चित्तथरारक शस्त्र कवायतीने वेधले लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शीखधर्माचे संस्थापक गुरू गुरुनानक जयंती बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील सर्व गुरुद्वारांमध्ये जाऊन भाविकांनी दर्शन घेतले. यानिमित्त गुरुद्वारांवर आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजावट केली होती.
गुरुद्वारातील फलकांवर गुरुनानक यांनी दिलेले संदेश लिहिण्यात आले होते. यानिमित्ताने गुरुगोविंदसिंगपुरा येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथून सायंकाळी पारंपरिक पद्धतीने नगर कीर्तन (मिरवणूक) काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, शस्त्रप्रदर्शन, आकर्षक रोषणाईचे झुंबर चित्तथरारक शस्त्र कवायतींच्या सादरीकरणाने लक्ष वेधले.
सकाळी ८.३० वाजता श्री अखंड पाठ साहिब समाप्ती झाली. यानंतर १०.३० वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी जिल्हाधिकारी निधी पांडे, आयकर आयुक्त श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी भाई लखविंदरसिंग चंदिगडवाले यांचे मुख्य कीर्तन झाले. या वेळी त्यांनी गुरुनानकांच्या चरित्रावर कीर्तन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जसपालसिंग ओबेरॉय यांचा विशेष सत्कार करून परमजितसिंग सहानी यांच्या वतीने गुरुगोविंदसिंगपुरा येथील गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला, तर जबिंदा परिवाराचाही या वेळी गुरुद्वाराची संपूर्ण सजावट, रांगोळी काढल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष हरविंदरसिंग बिं्रदा, सचिव कुलदीपसिंग नीर, सदस्य इंद्रजितसिंग छटवाल, कवलनयनसिंग लांबा, नरेंद्रसिंग जबिंदा, त्रितपालसिंग ग्रंथी, हरविंदरसिंग सलुजा, कुलदीपसिंग नोऱ्हा यांनी परिश्रम घेतले.

समर्पण, सामाजिक दायित्व आपल्या प्रामाणिकपणासाठी ओळख असलेल्या शीखबांधवांकडून गेल्या आठ दिवसांपासून जयंतीची मोठ्या उत्साहात तयारी करण्यात येत हाेती. शहरामधील भाई साहेब भाई दयासिंगजी भाई धरमसिंगजी गुरुद्वारा, धावणी मोहल्ला, श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा, गुरुगोविंदसिंगपुरा, गुरू तेेजबहादुर लंगर साहिबा, सिंधी कॉलनी आणि मिलिटरी गुरुद्वारा, छावणी या ठिकाणी कीर्तन, लंगरसह विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केेली होती.

नगर कीर्तनातील पारंपरिक वेषभूषा,शस्त्रप्रदर्शन, आकर्षक रोषणाईचे झुंबर चित्तथरारक शस्त्र कवायतींच्या सादरीकरणाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. गुरुगोविंदसिंगपुरा येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथून सायंकाळी वाजता पंचप्यारे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नगर कीर्तनात (मिरवणूक) समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. शहरात मुख्य मार्गावर, गुरुद्वाराजवळ सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. रात्री उशिरा धावणी मोहल्ला येथील भाई दयासिंगजी भाई धरमसिंगजी गुरुद्वारा येथे नगर कीर्तनाचा समारोप करण्यात आला.
या गुरुद्वारांमध्ये झाले विविध कार्यक्रम

पारंपरिक वेशभूषा आणि महाप्रसादाचे वाटप
उत्साह आणि जल्लोषात पारंपरिक वेशभूषा गुरुगोविंदसिंगपुरा येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथून सायंकाळी पारंपरिक पद्धतीने नगर कीर्तन (मिरवणूक) काढण्यात आली. छाया : रवी खंडाळकर