आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाची साथ मिळाली तर शहराचा कायापालट, सीएमआयएचे नवे अध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा यांचा आत्मविश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उद्योजकांना मनपाची साथ मिळाली तर शहराला आपण जगाच्या नकाशावर पोहोचवू शकतो. शहरातील अनेक कामे दोघांच्या सहभागाने सहज होऊ शकतात, असा आत्मविश्वास सीएमआयएचे अध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा यांनी "दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी बग्गा यांनी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला. नव्या टीममध्ये सर्वच सदस्य तरुण असून ते उद्योजकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत. "दिव्य मराठी’शी बातचीत करताना बग्गा म्हणाले, सीएमआयए ही संघटना जोमाने काम करीत असून शहरासाठी आमची यंग टीम सदैव तत्पर आहे. त्यासाठी मनपाची साथ हवी. रस्ते, वीज पाणी यासाठी मनपासोबत काम करण्यासही तयार आहोत. डीएमआयसीसारखी मोठी वसाहत होताना पाण्याची समस्या यायला नको. संघटनेचा इनोव्हेशन सेल, एनर्जी सेल इलेक्ट्रॉनिक सेल शहराच्या विकासात हातभार लावू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

रस्ते,उद्यानांची स्थिती सुधारली तरी फरक पडेल : आपल्याशहरात अनेक गोष्टी चांगल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मार्केटिंगवर विपरीत परिणाम होतो. शहरात १०४ उद्याने असून त्यापैकी फक्त चार ते पाचच उद्यानांची अवस्था बरी आहे. त्यांची स्थिती सुधारण्यासह चांगले रस्ते, पुरेसे पाणी या बाबींकडे लक्ष पुरवले तरी शहर विकासाचा वेग वाढेल. मात्र, त्यासाठी मनपाची साथ हवी आहे. शहरातील काही भागात वॉकिंग स्ट्रीट होऊ शकतो. पैठण गेट ते गुलमंडी हा रस्ता वॉकिंग स्ट्रीट केला अन् दुकाने २४ तास चालवण्याची परवानगी दिली तर शहराचे चित्रच वेगळे असेल, असा विश्वास बग्गा यांनी व्यक्त केला.

बग्गा म्हणाले, अनेक उद्योजकांनी शहरातील चौक दत्तक घेऊन ते सुंदर करून दाखवले आहेत. यापुढेही शहर विकासासाठी पुढाकार घेतला जाईल. औरंगाबाद शहरात डीएमआयसी, जालनाजवळ ड्रायपोर्ट आल्याने प्रचंड वेगाने प्रगती होत आहे. पण अजूनही विदेशी उद्योग का आकर्षित होत नाहीत याची कारणे सर्वांनाच ज्ञात आहेत. त्यावर उपाययोजना करावी लागणार आहे. त्यामुळेच विदेशी उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आम्ही स्वतंत्र सेल स्थापन केला असून हा सेल शहरात नवे उद्योग कसे आकर्षित करता येतील याकडे लक्ष देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...