आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२३ लाखांच्या गुटख्याचा गुन्हा नोंदीसाठी २२ तास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगावात गुटख्यासह पकडलेला ट्रक असा उभा हाेता.
माजलगाव- शहराजवळील परभणी टी-पॉइंटवर ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा ट्रक पकडून गोवा गुटख्याचे २३ लाख किमतीचे २८ भोत जप्त केल्याची कारवाई शनिवारी सायंकाळी केली. गुन्हा दाखल करण्यास मात्र पाेलिस अधिकाऱ्यांना चार-सहा तास नव्हे तब्बल २२ तास लागले.

माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका ट्रकमध्ये गुटखा येणार असल्याची खबर मिळाली. १७ अाॅक्टाेबर रोजी सायंकाळी कर्नाटक राज्यातून आलेल्या ट्रकमध्ये (एमएच ११ एएल ३७५२) कपड्याच्या गठ्ठ्यात लपवून गोवा, आरएमडी नावाचा गुटखा आणला होता.

पोलिसांनी हा ट्रक अडवून तपासणी केली असता आतमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रक पोलिस ठाण्यात आणून अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अन्न सुरक्षा निरीक्षक सागरकुमार तेरकर रात्रीच माजलगावला आले. रात्रीच ट्रकची संपूर्ण झडती घेतली असता गोवा गुटख्याचे २५ पाेते जप्त केले.

यांची कारवाई
२३लाखांच्या गुटख्यासह ३३ लाखांचा मुद्देमाल पकडण्याची कामगिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, उध्दव दहिफळे त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून केली अाहे.

कारवाईत वाढ
गुटखापकडण्याच्या अनेक कारवाया या महिन्यात समाेर अाल्या अाहेत. बीडच्या सय्यदनगरमध्ये शुक्रवारीच एक लाखाचा गुटखा पकडला हाेता. त्यात एकच दिवस गेला. यापूर्वीही अनेक ठिकाणी गुटखा पकडलेला अाहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना २२ तास लागले. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, १८ अाॅक्टाेबर रोजी दुपारी वाजता ट्रकचालक आदिक महादेव घाडगे (रा.धोंडेवाडी (ता. खटाव जि. सातारा) यांच्या विरुध्द २३ लाख २५ हजार रुपयांचा गुटखासह एकूण ३३ लाख २५ हजार१०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून अन्न सुरक्षा कायद्यासह भादंवि कलम ४७२ ४७३ , १८८, १७९ प्रमाणे गुन्हा दाखल करून या प्रकरणातील आरोपीस अटक केली. तपास पाेलिस करत अाहेत.