आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीट, अवकाळी, पर्जन्यछायेमुळे मान्सूनमध्ये अडथळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मार्च-एप्रिलमध्ये झालेली गारपीट व अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यामुळे यंदा पावसाचे वितरण असमान राहणार आहे. त्यातच पर्जन्यछायेत येणार्‍या मराठवाडा, पूर्व विदर्भ, नगर व सोलापूरसह उत्तर कर्नाटकाला याचा मोठा फटका बसणार आहे. खंडित पर्जन्यमानाचे बीज मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळीतच रुजले असल्याचे मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी हवामानशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले.

डॉ. साबळे म्हणाले, यंदाचा मान्सून वेगळा आहे. पावसात खंड पडण्याचे प्रकार यंदा वाढतील. वार्‍याचा वेग, सूर्यप्रकाश कमी असणारे दिवस आणि तापमानातील चढ-उतार या तीन प्रमुख कारणांचा यंदाच्या मान्सूनवर परिणाम दिसून येईल. पावसाचे असमान वितरण राहील. खंडित झालेला पाऊस येत्या चार-पाच दिवसांत पुन्हा बरसण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये पावसात २१% तूट : स्कायमेट
नैऋत्य मान्सूनच्या आगमनानंतर केरळात चांगला पाऊस होतो. या वर्षी पहिल्या टप्प्यात केरळात पावसाचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत केरळात सरासरीपेक्षा २१% तूट झाली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर लगेच आलेल्या अशोबा चक्रीवादळामुळे केरळ, तामिळनाडू, द. कर्नाटकात पाऊस कमी झाला, तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत पावसाचा जोर वाढलेला दिसला.

पर्जन्यछायेचाही फटका
यंदा मराठवाडा, पूर्व विदर्भ, नगर व सोलापूर जिल्हा या पर्जन्यछायेत येणार्‍या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या डोंगररागांवर अडल्याने कोकण व घाटमाथ्यावर पाऊस झाला. बाष्प नसणारे ढग सह्याद्रीच्या पूर्व बाजूस आले. त्याचा फटका मराठवाडा व इतर भागाला बसला.
बातम्या आणखी आहेत...