आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm Destroy Acres Of Farmland In Maharashtra

वादळाने कोलमडलेला खांब सतर्कतेमुळे हटवला, सेव्हन हिल्स उड्डाणपुलानजीकचा जीवघेणा प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शनिवारी सायंकाळी वादळी पावसामुळे वाकलेला सेव्हन हिल्स उड्डाणपुलानजीकचा पथदिव्याचा खांब एका तरुणाच्या सतर्कतेमुळे महापालिकेच्या पथकाने तातडीने हटवला. रस्त्याच्या मधोमध कोलमडलेल्या या खांबाच्या वायरमध्ये एका तरुणीची स्कूटी अडकली. सुदैवाने तिला इजा झाली नाही.
सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ दुभाजकांत साधारणत: २२ वर्षांपूर्वी रोवलेला विद्युत खांब शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रस्त्याच्या बाजूने कोलमडला. केबलमध्ये अडकल्याने तो जमिनीवर कोसळला नाही. हा खांब गंजलेला होता. या खांबावरील केबल रस्त्यावर आल्याने तरुणीची स्कूटी त्यात अडकली. याच वेळी तेथून जाणारा तरुण सचिन पाटील अन्य एका तरुणाने तिला मदतीचा हात दिला. इतर कोणी जखमी होऊ नये यासाठी त्याने महावितरण, अग्निशमन आणि मनपाच्या विद्युत विभागाशी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. प्रतिनिधीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जवळच असलेल्या अग्निशमन कार्यालयात जाऊन या घटनेची माहिती दिली.
अग्निशमनकडे अपुरी यंत्रणा
अग्निशमनविभागाचे प्रमुख डी. डी. साळुंखे, जवान विनायक कदम, नईम पठाण, अशोक खोतकर, एस. आर. मोहोळ यांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले. मात्र, त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा नव्हती. त्यामुळे सदर प्रतिनिधींनी मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बनसोडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. यानंतर काही मिनिटांतच विद्युत विभागाचे शाखा अभियंता के. डी. देशमुख, ठेकेदार प्रसाद राऊत, कर्मचारी राहुल जाधव, राजू करमाडे, किशोर रमंडवाल क्रेेनसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काही मिनिटांतच हा धाेकादायक विद्युत खांब काढला. विद्युत खांब गंजल्याने वादळी पावसात असा कोलमडला.
"दिव्य मराठी'चे अाभार
खांबहटवल्याने वाहतूक सुरळीत झाली. खांब जमिनीवर आदळून २५० व्हॅटचा दिवा फुटला. आमच्या प्रयत्नांना "दिव्य मराठी'ने चांगली साथ दिली याबद्दल आभार. सचिनपाटील, मदतकरणारा तरुण शहरात बसवण्यात आलेले शेकडो पथदिव्यांचे खांब जीर्ण झाले आहेत. विद्युत खांबांचे आयुष्य साधारणत: २० वर्षे असते. मात्र, शहरातील अनेक भागांतील खांब साधारणत: २५ ते ३० वर्षे जुने आहेत. त्यामुळे हे खांब धोकादायक ठरू शकतात.