आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्त शेतकरी अजूनही शासकीय मदतीपासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- फेब्रुवारी महिन्यात शेंदुरवादा परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने गारपीटग्रस्त शेतकºयांना केलेली आर्थिक मदतीची घोषणा मात्र हवेत विरली आहे. महसूल प्रशासनाने पिकांचे चुकीचे पंचनामे केल्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गंगापूर पंचायत समितीचे सदस्य कृष्णा पाटील सुकासे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
वाळूजलगतच्या शेंदुरवादा, शिवपूर, सावखेडा, मांगेगाव, हर्सुली, वझर, महालक्ष्मीखेडा, शंकरपूर, बोरूडी गावात फेबु्रवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मोसंबी, चिकू, डाळिंब, केळी, आंबा, गहू, कांदा, ऊस ही पिके हातची गेली. दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच हतबल असलेला शेतकरी या संकटामुळे पार हादरून गेला आहे. महसूल विभागाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कार्यालयात बसून केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. यामुळे शेतक-यांना अद्याप मदत मिळाली नसल्याचे पंचायत समिती सदस्य कृष्णा पाटील सुकासे यांनी सांगितले. पिकांच्या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी राजू शिंदे, मतेश सुकासे, विनोद काळे, नारायण साध्ये, गणेश राऊत, शाकीर शेख,संदीप शेळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.