आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm News In Marathi, Marathwada, Divya Marathi

गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या वर्षी फेब्रुवारीत मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळांची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक यंदा भयंकर गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या संसारांची, शेतीची पाहणी करण्यासाठी बुधवार-गुरुवार मराठवाड्याच्या दौ-यावर येत आहे. पथक नेमके कोणत्या भागाला भेट देणार हे ठरले नसले तरी एक दिवस पाहणी आणि दुस-या दिवशी बैठक असे दौ-याचे नियोजन आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत या दौ-याची रूपरेषा स्पष्ट होऊ शकेल. विभागीय आयुक्तांशी चर्चेनंतर पथकाच्या पाहणीचा परिसर निश्चित होईल. गारपिटीमुळे 8 जिल्ह्यांत 19 लाख हेक्टरवर रब्बीची लागवड होती. त्यातील निम्मी पिके नष्ट होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.


विभागीय आयुक्तांना प्राप्त अहवालानुसार 8 जिल्ह्यांत 3 लाख 67 हजार हेक्टरवरील फळ व अन्य पिके नष्ट झाली. पंचनामे सुरू असून 3 मार्चनंतर झालेले नुकसान पूर्वीपेक्षा तिप्पट असण्याची शक्यता आहे. नंतरच्या गारपिटीत पाळीव तसेच वन्य प्राणी, पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ही आकडेवारी सोमवारपर्यंत स्पष्ट होईल. 2012-13 मध्ये मराठवाडा दुष्काळाने होरपळला. यंदा आशा असताना गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकरी हवालदिल आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत हे नुकसान अधिक आहे.


सोमवारपर्यंत विभागीय आयुक्तालयाला
प्राप्त झालेला अहवाल असा

* 50 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान
1 लाख 60,859 हेक्टर
* 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान
1 लाख 6,859 हेक्टर
* मृतांची संख्या 08
* जनावरांचा मृत्यू
83 लहान
65 मोठी
एकूण 3 लाख 67 हजार 227 हेक्टर
* घरांचे नुकसान
762 अंशत:
17 पूर्णत:
* 3 तारखेनंतर झालेल्या गारपिटीत याच्या
दुपटीने नुकसान झाल्याचा अंदाज आहे.