आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात वादळी वा-यांसह पाऊस आणि गारपीटांचा वर्षाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/बीड/लातूर - मराठवाड्याच्या अनेक भागांत सोमवारी वादळी वार्‍यांसह पाऊस आणि गारपीट झाली. बीड व नांदेड जिल्ह्यांना प्रामुख्याने गारपिटीचा तडाखा बसला. धारूर तालुक्यात सुपारीएवढय़ा गारा पडल्या. मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि सोमवारी गारपिटीचा जोरदार पाऊस कोसळल्याने गहू, ज्वारी, हरभरा, कांदे, आंबा, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आदी पिकांचे नुकसान झाले.


औरंगाबादेत 26.6 मिमी
सोमवारी रात्री 9 ते 9.40 दरम्यान वादळी वार्‍यासह गारपिटीने शहराला झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागांत चार तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. 26.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली आहे.


अनेक जिल्ह्यांना वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा
* लातूर, नांदेडसह बीड जिल्ह्यात गारपीट, वडवणीत वीज पडून महिलेचा मृत्यू, मानवत, सोनपेठलाही तडाखा
* बीड जिल्ह्यात परळी, अंबाजोगाई, शिरूर, वडवणी, बीड तालुक्यातील 61 गावांना फटका
* नांदेड जिल्ह्यात जोरदार गारपीट.
* ढोरकीन, जायकवाडी, फुलंब्री, खुलताबाद, वेरूळ, बाजारसावंगी, सिल्लोड परिसरात वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस.
* वडवणीत वादळी पाऊस सुरू झाल्यानंतर एका बैलगाडीवर वीज कोसळून सत्यभामा कानडे (40) ही महिला जागीच ठार झाली.
* उस्मानाबाद तालुक्यातही गारांचा पाऊस, शेतीचे प्रचंड नुकसान. आठवड्यात दुसर्‍यांदा झोडपले.
* लातूर : जळकोट तालुक्यात वीज कोसळून दोघे जण गंभीर जखमी झाले. निटूर (ता. निलंगा) येथेही सायंकाळी जोरदार गारपीट झाली.