आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरची हाजरा विज्ञान प्रदर्शनासाठी चालली जपानला; आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- परगावी असतानाही मोबाइलचा वापर करून घरात पाणी भरून ठेवता येते का? अशक्य वाटणारी ही बाब सोलापुरातील दि प्रोग्रेसिव्ह उर्दू शाळेतील हाजरा मुल्ला विद्यार्थिनीने प्रत्यक्षात आणली आहे. तिच्या या विज्ञान प्रकल्पाची जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. २६ मे रोजी ती जपानला रवाना होत आहे. 

हाजरा फेरोज मुल्ला ही २०१५ मध्ये इयत्ता आठवीत होती. तेव्हा तिने या विज्ञान प्रकल्पाची निर्मिती केली. तिचे वय त्यावेळी कमी असल्यामुळे तिला जपानला जाता आले नाही. २०१७ मध्ये तिने दहावीची परीक्षा दिली. आता जपानमधून तिला बोलावणे आले असून, ती २६ मे रोजी जपानला रवाना होत आहे. दोन महिन्यांपूर्वी जपान येथून तिला पत्र आले आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. अवघ्या दोन महिन्यांत तिच्या कुटुंबीयांनी शाळेच्या मदतीने पासपोर्टसह अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव केली. तसेच, ती जपानला गेल्यानंतर इंग्रजीत ती कुठेही कमी पडू नये म्हणून इंग्रजी स्पीकिंग काेर्सही लावण्यात आला. जपानला जाण्यासाठी तिची आता पूर्ण तयारी झाली आहे. 

हाजरा ही रामवाडी येथे राहते. तिचे वडील फेरोज हे मेकॅनिक आहेत. तिला शिक्षणाचा कसलाच वारसा नाही. मात्र, आई अनिसा आणि मामा दाऊद कोलारकर यांनी हाजराच्या विज्ञान आवडीला प्रोत्साहन दिले. तसेच, तिला शाळेत सादिका बारागज्जी या शिक्षिकेचे मार्गदर्शन लाभले. 

मला लहानपणापासूनविज्ञानाची आवड आहे. मामामुळे माझ्या आवडीला चालना मिळाली. यानंतर शाळेतील शिक्षिका सादिका बारागज्जी यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान क्षेत्रात मला काहीतरी वेगळे करून दाखवायचे आहे. 
- हाजरा मुल्ला, विद्यार्थिनी 
बातम्या आणखी आहेत...