औरंगाबाद - आपल्या देशात हनुमानाची लाखो मंदिरे आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या अख्यायिका आहेत. काही मंदिरांना जागृत स्थान म्हटले जाते, त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारुतीसह सात मंदिरांचा समावेश आहे. येथे हनुमान झोपलेल्या स्थितीत आहेत. येथे तुम्ही काही इच्छा व्यक्त केली तर ती नक्की पूर्ण होते, अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. विशेषतः युवकांच्या इच्छापूर्तीसाठी ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.
काही तरुणांना उद्योग-व्यवसाय-नोकरी यात दीर्घकाळ यश येत नाही, त्यांचा विश्वास आहे, की बजरंगबलीची उपासना केल्यानंतर आपल्या समस्यांचे निरसन होते. या मंदिराची ख्याती काय आहे याचा अंदाज येथे जमणार्या गर्दीवरुन लावला जाऊ शकतो. खुलताबाद येथील मंदिरासह अलवर, राजकोट, अलाहाबाद, इटावा, चंदौली, छिंदवाडा येथे ही सात मंदिरे आहेत.
भद्रा मारुती मंदिर, खुलताबाद (औरंगाबाद) महाराष्ट्र
औरंगाबाद जिल्ह्यापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर खुलताबाद तालूका आहे. येथे भद्रा मारुती मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे, येथील बजरंगबलीची मूर्ती निद्रा अवस्थेत आहे. हनुमान जयंती आणि रामनवमी निमीत्त येथे भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. अनेक भक्त औरंगाबाद आणि आसपासच्या परिसरातून श्रावणात येथे अनवाणी पायाने चालत येतात.
भद्रा मारुती मंदिरातील हनुमानाच्या मुर्तीबद्दल अनेक अख्यायिका आहेत. मात्र, त्यातील एक राजा भद्रसेन यांची कथा प्रसिद्ध आहे. अशी मान्यता आहे, की राजा भद्रसेन तलावाच्या किनार्यावर हनुमानाची गिते गात होता. एक दिवस बजरंगबली तिथे प्रकट झाले आणि राजाला गाणे गाताना ऐकले. गाणे ऐकता-ऐकताच हनुमानाला झोप लागली. तेव्हा पासून हनुमान येथे निद्रीस्त असल्याचे मानले जाते.
पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, देशात आणखी कुठे आहे बजरंगबलीची अनोखी मूर्ती