आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बॉल देतोय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्राथमिकच्या मुलांमधील अभ्यासासंबंधीची भीती दूर होऊन शिक्षणाबद्दल अधिक गोडी निर्माण व्हावी यासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बरेच नवीन बदल केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना ग्रेड अथवा मार्क देण्यात येऊ नयेत, क्लास टेस्टऐवजी ग्रुप अॅक्टिव्हिटी घेण्यात यावी. तसेच गृहपाठ किंवा एखादा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर हॅपी बॉल चिकटवून त्यांना प्राेत्साहन दिले जात आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा प्रकल्प अथवा गृहपाठ पूर्ण केल्यानंतर शिक्षक ग्रेड म्हणजेच लाल पेनने चांगले, उत्तम, सुधारणेची गरज असा शेरा देत होते. परिणामी, बालमनावर याचे विपरीत परिणाम होत होते. ही बाब लक्षात घेत आता स्माइली फेस चिकटवण्याचा निर्णय झाला. याव्यतिरिक्त सीबीएसईने पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी नवीन गाइडलाइन दिल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे, अशी माहिती शिक्षिका आशा कोचुरे यांनी दिली.
नवे बदल
*अंतर्गत प्रात्यक्षिक प्रकल्पांची तपासणी ग्रेडिंगनुसार असावी.
* पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ग्रेड अथवा मार्क्स देण्यात येऊ नयेत.
* दुसरीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके ही शाळेतच ठेवण्यात यावीत.
* तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ग्रेडिंग सिस्टिम लागू करावी.
* क्लास टेस्टऐवजी ग्रुप अॅक्टिव्हिटी घ्यावी.
* वर्षभर परीक्षा घेण्याऐवजी ठरावीक वेळेत टेस्ट घेण्यात यावी.
* रिमार्क स्माइल स्वरूपात द्यावे.