आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहारप्रकरणी २० जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- शासनाच्या विविध योजनांमध्ये खोटे दस्तएेवज तयार करून लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार, स्थानिक पुढारी अशा २० जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी सांगितले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत २७ लाखांचा अपहार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळपिंप्री (ता. गंगापूर) येथे सन २०१० ते ३१ जुलै २०१५ दरम्यान सरपंच शालिनी विठ्ठल तोगे, प्रयागाबाई बाळू पुरी, उपसरपंच उत्तम लक्ष्मण निकम, पंचायत समिती सदस्य कृष्णा देवराव सुकासे, ग्रामपंचायत सदस्य हरिचंद्र रंगनाथ शेगुळे, ग्रामसेवक आर.पी. मेनघर, एस. एस. डोळसे, ग्रामरोजगार सेवक अण्णासाहेब आसाराम शेगुळे, सोमनाथ भाऊसाहेब दुबिले, कनिष्ठ अभियंता एस. डब्ल्यू. आसवले, शाखा अभियंता, सिंचन डी.टी. कांबळे, उपअभियंता सिंचन दळवी, गटविकास अधिकारी स्नेहा देव, गटविकास अधिकारी विजय खोमणे, सहगटविकास अधिकारी आर. एस. त्रिभुवन, सहगटविकास अधिकारी अनिल शिरसाट, तत्कालीन तहसीलदार रूपा चित्रक, तहसीलदार अरुण जऱ्हाड, ठेकेदार पिराजी वसंत मनाळ, पोस्ट मास्तर प्रल्हाद भानुदास निकम यांनी शासनाच्या विविध योजनांमध्ये खोटे दस्तएेवज तयार केल्याचा आरोप आहे. फिर्यादी अण्णासाहेब भानुदास निकम (६५,रा. तळपिंप्री) यांच्या न्यायालयीन लढाईनंतर न्यायालयाने यासंबंधीचे आदेश दिले. ३१ जुलै रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांत संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

व्हाइट कॉलर आरोपी फरार
गुन्हादाखल होऊन २४ तासांचा अवधी होत असताना एकही आरोपी पोलिसांच्या ताब्यात कसा आला नाही की पोलिसच आरोपींना पाठीशी घालत आहेत, अशी चर्चा वाळूजसह गंगापूर तालुक्यात सुरू आहे. संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. एल. केरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाइल बंद होता.
बातम्या आणखी आहेत...