आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मळ मनाचा नेता गमावला : बागडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते होते. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकारणाचे मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. मंगळवारी टीव्ही सेंटर चौकात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी शिवसेनेचे नगरसेवक किशोर नागरे, महेश माळवतकर, राष्ट्रवादीचे काशिनाथ कोकाटे, माजी महापौर सुदाम सोनवणे, दौलत खरात, अप्पा पगारे यांची उपस्थिती होती. सोपान खोसरे पाटील यांनी या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या वेळी नागरे म्हणाले, आबांचे निधन ही राज्यासाठी दु:खाचा दिवस आहे.
आबाच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली. त्यांच्या निधनाने चांगला माणूस हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर सोनवणे म्हणाले, आबांच्या जाण्याने सर्वसामान्याचा नेता हरपला आहे.

जनहित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कायम काम केले. त्यामुळे राजकारणाची न भरुन निघणारी हानी झाल्याचे त्यांनी सांिगतले. तर माळवतकर म्हणाले, आबाच्या जाण्याची घटना ही राज्यातील सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. त्यांच्या जाण्याने जनतेचा नेता हरवला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर कोकाटे म्हणाले, आबांचा सर्वांनीच आदर्श घ्यावा असे राजकारण त्यांनी केले. कायम सर्वसामान्याचा विचार त्यांनी केला. त्यामुळे राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी युसूफ पठाण, रशीद पटेल, बाळू नाना गुर्जर विकास पाटील, कैलास कुंटे यांची उपस्थिती होती.

निर्मळ मनाचा नेता गमावला : बागडे
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या जाण्याने एक निर्मळ मनाचा नेता हरपल्याची भावना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आबांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. लोकमनाचा आदर ठेवून लोकांना पटेल, आवडेल असेच राजकीय क्षेत्रात वागले पाहिजे असे आबांचे ध्येय होते.
विरोधी बाकावरून केलेल्या भाषणामुळेच ते १९९६ मध्ये उत्कृष्ट संसदपटू ठरले. १० नाव्हेंबरला आमदारांचा शपथविधी सुरू असताना त्यांचा गाल पाहून त्यांना विचारले असता दातांचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. विधानसभा अध्यक्ष व विरोधी पक्षनेत्याच्या निवडीनंतर केलेली त्यांची भाषणे सभागृहाला उत्तम मार्गदर्शन करणारी होती असे बागडेंनी सांगितले.