आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haribhau Badge Nominates Speakers Of Maharashtra Vidhan Sabha

हरिभाऊंचा निस्पृहपणाच घेऊन गेला त्यांना अध्यक्षपदापर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - १९९८चा प्रसंग. हरिभाऊ बागडेंकडे युती सरकारात अन्न व नागरी पुरवठा खाते होते. जालना जिल्ह्यातील त्यांच्या एका जवळच्या नातेवाइकाने रेशन दुकानात गैरव्यवहार केला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याचा परवाना निलंबित केला. आपण बागडेंच्या गळ्यातील ताईत आहोत. त्यामुळे एका मिनिटात परवाना पुन्हा मिळवून घेऊ, अशा अाविर्भावात तो नातेवाईक बागडेेंना औरंगाबादेत येऊन भेटला. अधिकाऱ्याला बोलावून घ्या आणि ऑर्डर काढा, असा आग्रह त्याने धरला. तेव्हा नानांनी त्याची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. चहा, फराळ दिला. मात्र, माझ्या कितीही जवळचा असला तरी नियमाच्या बाहेर माझ्याकडून काम होणार नाही, असे त्याला ठणकावून सांगितलेच. शिवाय अधिकाऱ्यालाही तशी सूचना केली. निस्पृह, नियमावर बोट ठेवूनच वागण्याचा हा स्वभावच त्यांना निस्पृहतेच्या कामगिरीसाठी निर्माण केलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या सर्वोच्च सन्मानापर्यंत घेऊन गेला, अशी भावना आज भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
टोपीला न्याय मिळाला
स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे बागडेंचा नेहमीच ज्येष्ठ म्हणून गौरव करायचे. साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात प्रमोद महाजन यांनी राजकारणातून टोपी घालणारांची संख्या कमी होत असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली होती. राज्यात भाजपमध्ये हरिभाऊ बागडे ही टोपी घालणारी एकमेव व्यक्ती सहकार व पक्षात असल्याचे त्यांनी सांगितले होते. आज शुभ्रटोपीधारी आमदार बागडेंच्या रूपाने विधानसभा अध्यक्ष झाले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, हरीभाऊ वागडेंच्‍या व्‍यक्तित्‍वाचे पैलू