आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्यांदा मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी देऊन सत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- दुसऱ्यांदाही मुलींना जन्म देणाऱ्या दोन मातांचा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात साडी-चोळी देऊन सत्कार केला.

महाराष्ट्र शासनाने ऑपरेशन कायापालट मोहिमेअंतर्गत शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी नवनवीन संकल्पना, उपक्रम राबवणे सुरू केले आहे. सुनीता आदम गवळी (रा. शेकटा) व शीला गणेश जोगदंड (रा. करमाड) दोघींना दुस ऱ्यांदा मुलीस जन्म दिला. या मोहिमेअंतर्गत रुग्णालयामध्ये प्रसुती होऊन मुलीस जन्म दिलेल्या मातांचा व मुलींचे स्वागत म्हणून बागडे यांच्या हस्ते साडी, चोळी देऊन सत्कार करण्यात आले.