आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haribhau Bagde News In Marathi, Divya Marathi, BJP, Aurangabad

पक्षाने पद देताच हरिभाऊ बागडे झाले प्रचारात सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांनी नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करताच महिनाभरापासून नाराज असलेले बागडे सक्रिय झाले असून त्यांनी फुलंब्रीत शक्तिप्रदर्शन केले.
प्रदेशाध्यक्ष देवेद्र फडणवीस यांनी बागडे यांना बुधवारी नियुक्तीचे पत्र पाठवल्यानंतर बागडे आणि त्यांच्या सर्मथकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी (10 एप्रिल) त्यांच्या उस्मानपुरा येथील निवासस्थानी सकाळी 10 वाजता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी व सर्मथकांची गर्दी झाली होती. प्रदेश चिटणीस अतुल सावे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी महापौर डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष बापू घडामोडे, स्थायी समिती सभापती नारायण कुचे, डॉ. नारायण फंड, रघुनाथ काळे, सजनराव मते, विकास दांडगे, साहेबराव डिघुळे, अशोक पवार, संजय औताडे, मोतीलाल शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
दानवेंचा जीव भांड्यात : बागडेंनी प्रचारावर बहिष्कार टाकल्यामुळे खासदार रावसाहेब दानवे अस्वस्थ झाले होते. भाजपने निष्कासित केलेले बागडेंचे खंदे सर्मथक नगरसेवक राजू शिंदे यांनी काँग्रेस उमेदवार विलास औताडेंचा प्रचार सुरू केला आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या कार्यक्रमास गैरहजर राहून बागडे काँग्रेस आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासमवेत हाकेच्या अंतरावर एका कार्यक्रमात होते. यामुळे दानवेंची चिंता वाढली होती.
फुलंब्रीत केले शक्तिप्रदर्शन
बागडे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात फुलंब्री येथून केली. नितीन गडकरी यांची 12 एप्रिल रोजी फुलंब्री येथे सभा असून सभेच्या तयारीसाठी त्यांनी माजी मंत्री नामदेवराव गाडेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. बैठकीला मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.