आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद - हार्ले डेव्हिडसन ग्रुपची शहरात ‘धूम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना रोडवरून हार्ले डेव्हिडसन या दुचाकी वाहनांचा ताफा धडधडत गेला आणि काही वेळ रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी, वाहनचालक अवाक होऊन त्याकडे बघत राहिले. हा अनुभव औरंगाबादकरांनी रविवारी घेतला. ‘वर्ल्ड राइड डे’ निमित्त मुंबईच्या हार्ले डेव्हिडसन ग्रुपने मुंबई- औरंगाबाद अशा ‘बाइक राइड’चे आयोजन केले होते. 15 जणांच्या या ग्रुपमध्ये दोन महिला रायडर आहेत. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे हा ग्रुप थांबला होता.

या ग्रुपमध्ये मुंबई- पुणे आणि अहमदाबाद येथील सदस्य असून देवाशिष घोष आणि फ्रेडी पिटावाला हे समन्वयक आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी हा ग्रुप तयार झाला. मागील वर्षी ‘वर्ल्ड राइड डे’ला हा ग्रुप मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यात गेला होता. वर्षभरात या ग्रुपच्या दोन राइड होतात. आतापर्यंत भुतान, अमृतसर, नागपूर या ठिकाणी ते गेले आहेत. हा ग्रुप औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच आला आहे. अजिंठा, वेरूळसह अनेक पर्यटनस्थळांना त्यांनी भेट दिली. या ठिकाणचे वातावरण, जेवण आम्हाला भावले असल्याचे सदस्य शेखर शृंगारे यांनी सांगितले.