आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harrashment Throw Farm Debate;Suspended Staff Member Committed Suicide

शेतीच्या वादातून छळ; निलंबित कर्मचार्‍याची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शेतीच्या वादातून होणार्‍या छळाला कंटाळून महावितरण कंपनीच्या निलंबित कर्मचार्‍याने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. करमाड पोलिसांनी इनूस अजिज पठाणसह पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने 19 मार्चपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. मुकुंदराव नाथाजी सोनवणे असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. आरोपी इनूस अजिज पठाण याने 22 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांना लाचेच्या प्रकरणात अडकवले होते.
मुकुंदराव नाथाजी सोनवणे यांची बदनापूर शिवारात जमीन होती. सात वर्षांपूर्वी ही जमीन इनूस अजिज पठाण याने विकत घेतली होती. या जमिनीवरून पठाण आणि सोनवणे यांच्यात वाद होता. या वादातून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता मुकुंद सोनवणे यांनी विष घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सोनवणे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पठाण कुटुंबीयाच्या छळाला कंटाऴून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी करमाड पोलिसांनी इनूस अजिज पठाण, अजिज सरदार पठाण, इसूफ अजिज पठाण, रेहाना अजिज पठाण, इद्रिस अजिज पठाण या पाच जणांना अटक केली आहे.
इनूसविरुद्ध यापूर्वीही करमाड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याने जालना येथील एका पोलिस उपनिरीक्षकालाही लाचेच्या गुन्हात अडकवले होते. 22 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांनाही लाचेच्या प्रकरणात अडकवले होते.