आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: आमदार हर्षवर्धन जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश? दसरा मेळाव्यात करणार जाहीर प्रवेश?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज (बुधवार) मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे समजते. जाधव यांनी कन्नड मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. शिवसेनेच्या आगामी दसरा मेळाव्यात जाधव जाहिरपणे सेनेत प्रवेश करणार आहेत, असे वृत्त आहे.

मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी मनसेने काँग्रेस आघाडीला साथ दिल्यामुळे त्‍यांची नाराजी होती. तसेच कन्‍नड पंचायत समितीच्‍या निवडणुकीत जाधव यांनी पक्षादेश मानण्‍यास नकार दिल्‍यावरुन मनसेचे नेते त्‍यांच्‍यावर नाराज होते. यावरुनच वादाची ठिणगी पडली होती. कन्नड पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेच्या मदतीने सभापतिपद मिळवले. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत आठपैकी मनसेच्या सहा सदस्यांनी आघाडीला, तर आमदार जाधव सर्मथक दोन सदस्यांनी युतीला मतदान केल्याने मनसेत फूट पडल्याचे दिसून आले होते.

यापूर्वीही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. मनसेतील काही नेत्‍यांकडे जाधव यांचा रोष होता. हे नेते पक्षाचे अध्‍यक्ष राज ठाकरेंपर्यंत आपली भूमिका मांडण्‍याची संधी देत नसल्‍याचे जाधव यांचे म्‍हणणे होते. त्‍यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचे मन वळवले होते. त्यामुळे ते पक्षात कायम राहिले होते. परंतु, आता पुन्‍हा जाधव यांचा असंतोष उफाळून आला आहे.