आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधवांची नवी अाघाडी; खैरे म्हणतात, त्यांचा नेम नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - कन्नड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेससाेबत युती केल्याने स्थानिक शिवसैनिकांचा हिरमाेड झाल्याचा अाराेप करत खा. खैरे हे शिवसेना संपवायला निघालेत का, असा प्रश्न अामदार हर्षवर्धन जाधव यांनी उपस्थित केला. तर कन्नड नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव निघाल्याने अामदार जाधवांचा हिरमाेड झाल्याचे खासदार खैरे यांनी म्हटले अाहे. अामदार जाधव वरिष्ठांना विचारता परस्पर निर्णय घेतात स्टेटमेंट देतात, असेही खासदार खैरे यांनी जाधवांच्या अाराेपाला उत्तर देताना म्हटले अाहे.
शुक्रवारी अामदार जाधव यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एका नव्या अाघाडीची घाेषणा केली. अाता त्यांनी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे विकास अाघाडी स्थापन केली अाहे.
खासदारखैरे म्हणतात, अामदारजाधव कधी काय स्टेटमेंट देतील याचा नेम नाही. मुळात स्व. रायभान जाधव विकास अाघाडी स्थापन करतानाही त्यांनी वरिष्ठ पातळीवर कुणाशीही चर्चा केली नव्हती. आता शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची अाघाडी त्यांनी स्थापलीय. ते निर्णय कधी बदलतील याचा नेम नाही.
अामदारजाधव म्हणतात, शिवसेनेतर्फेमी १८ उमेदवार उभे केले होते. पक्षाची तालुक्यात मोठी ताकद असल्याने हा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी खा. खैरे यांनी फाटा देऊन स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना काँग्रेससोबत युती करण्याचे आदेश दिले. यामुळे अाता सरसेनापती बाळासाहेब ठाकरे विकास आघाडी स्थापन करत अाहे.
बातम्या आणखी आहेत...