आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harsool Central Jail News In Marathi, At Aurangabad

हर्सूल कारागृहात नवीन १६ बराकी उभारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातीलहर्सूल मध्यवर्ती कारागृहात लवकरच १६ नवीन बराकी निर्माण केल्या जाणार असून कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी तसेच सुरक्षति‍तेचे उपाय म्हणून संपूर्ण कारागृह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नगिराणीखाली आणले जाणार आहे. राज्य शासनाने या कामांसाठी आर्थिक तरतूदही केली असून त्याबाबतचा जीआर सप्टेंबरला जारी केला. राज्यभरातील २८ तुरुंगांत सुधारणा करण्यासाठी एकूण १५ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हर्सूल कारागृहातील कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त बराकींची गरज जाणवत होती. कारागृह प्रशासनाने ही बाब वेळोवेळी गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. हर्सूल कारागृहाशिवाय राज्यातील इतर २७ कारागृहांमध्ये बराकी उभारण्यासह इतर संरक्षणविषयक तरतुदी करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

हर्सूल कारागृहासाठी नेमका किती निधी खर्च होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, १६ बराकींसाठी कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सीसीटीव्हीसाठी किती खर्च केला जाईल, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

मलनिस्सारण वाहिन्या, भिंतींची दुरुस्ती
हर्सूलबरोबरचप्रत्येक जिल्हा कारागृहामध्येही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्याही टाकल्या जातील, तर काही कारागृहांच्या भिंतींची दुरुस्ती केली जाईल. नाशिक कारागृहात महिला कैद्यांसाठी नवीन बराकी बांधल्या जातील. त्यासाठी १६ लाख २३ हजारांची तरतूद आहे. धुळ्यात दोन वॉच टॉवर उभारले जाणार असून त्यासाठी लाख तर बराकींमध्ये फरशी बसवण्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अकोला जिल्हा कारागृहातील कामांसाठी १६ लाख रुपये तर परभणी येथे महिला कैद्यांसाठी बराक बांधण्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीड येथे दोन नवीन वॉच टॉवर तसेच वॉटर प्युरिफायरसाठी २३ लाख रुपये देण्यात आले आहेत. नांदेड येथे याच कामांसाठी १७ लाख रुपये खर्च करता येतील. सोलापूरसाठी ११ लाख तर अहमदनगर कारागृहासाठीही १४ लाख रुपये देण्यात आले आहेत.