आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूलच्या कैद्यांनी बनवलेले बेडशीट्स रेल्वेत वापरणार, रेल्वे प्रशासनाशी केला करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हर्सूल कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली वस्त्रे, बेडशीट्स आता सामान्यांना विकत घेता येणार आहेत. विशेष म्हणजे, कैद्यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांना साथ म्हणून रेल्वे प्रशासन हे बेडशीट आता रेल्वेत वापरणार आहे. पहिल्या टप्प्यात सोळाशे बेडशीट्स रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात आले आहेत. गुरुवारपासून तीन दिवस हर्सूल कारागृहात वस्त्र इतर वस्तूंचे प्रदर्शन आयोजितकेल्याचे कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे यांनी सांगितले.

बेडशीट्सची बांधणी, डिझाइन रंग सजावट कैद्यांनीच केली आहे. लहान मुलांचे कपडे, सांस्कृतिक पेहरावात वापरले जाणारे जॅकेट्सही कैद्यांनी शिवले आहेत. विशेष म्हणजे, बाजारात मिळणाऱ्या कपड्यांच्या दर्जापेक्षा उत्तम दर्जा या कपड्यांचा असून बंदिजनांनी मन लावून ही सर्व उत्पादने तयार केली असल्याचे मोरे यांनी सांगितले. कैद्यांनी तयार केलेल्या इतर वस्तूंचेही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारागृहातर्फे दरवर्षी प्रदर्शन भरवण्यात येते. यंदा २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान कारागृहामध्ये या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी या वेळेत सर्वसामान्यांसाठी हे प्रदर्शने खुले राहणार आहे. जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद््घाटन होणार असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन बंदिजनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अधीक्षक मोरे वरिष्ठ कारागृह अधिकारी राजराम भोसले यांनी केले आहे.

कैद्यांनी उत्कृष्टउत्पादने तयार केली आहेत. बाजारभावात मिळणाऱ्या उत्पादनांएवढीच ही उच्च दर्जाची आहेत. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन बंदिजनांना प्रोत्साहन द्यावे.
-बी. आर. मोरे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह

उत्कृष्ट उत्पादने तयार
कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंपैकी उच्च दर्जाच्या लाकडी वस्तू पणत्यांना तीन वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात मोठी मागणी असते. यंदाही कैद्यांनी उत्तम पणत्या तयार केल्या असून सागवानाची छोटी बैलगाडी, गांधीजींचा छोटा चरखा, माचोळी (लाकडाचे बसण्याचे साधन), पोळपाट, साग चौरंग, आकर्षक चावी स्टँड, डायनिंग चेअर, जजेस चेअर, स्टडी टेबल, ड्युअल डेक्स सनटॉप, अगरबत्ती स्टँड आदी लाकडी वस्तू विकत घेता येणार आहेत. वस्तू विक्रीतून बंदिजनांचा विकास व्हावा, कैद्यांच्या मानसिकतेतून ते बाहेर यावेत, हा या सर्व उपक्रमामागचा उद्देश असल्याचे कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी राजाराम भोसले यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...