आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूल कारागृहातून ६०० कैद्यांचे स्थलांतर करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - आैरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कच्चे कैदी असल्याने यातील सहाशेवर कैदी नाशिक आणि जालना येथील कारागृहात हलविले जाणार असल्याची माहिती आैरंगाबाद कारागृहाचे अधीक्षक विनोद विष्णुपंत शेकदार यांनी शपथपत्राद्वारे हायकोर्टात सादर केली. ट्रायल कोर्टांची संख्या वाढविण्यासंबंधी विधी न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना माहिती सादर करण्याचे आदेश न्या. बी. पी. धर्माधिकारी न्या. ए. एम. बदर यांनी दिले.
आैरंगाबादच्या हर्सूल येथील कारागृहाची क्षमता सहाशे असताना त्यात महिला पुरुष कैद्यांची संख्या १६७७ इतकी आहे. क्षमतेच्या तिप्पट कैदी कारागृहात ठेवण्यात आल्याचे अॅड. रूपेश जैस्वाल यांनी पार्टी इन पर्सन हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि जगण्याचा हक्क संविधानात देण्यात आला असून यातील कलम २१ चे उल्लंघन करण्यात आल्याचे याचिकेत नमूद केले. ट्रायल न्यायालयांची संख्या कमी असून ती वाढविण्यात यावी. यात प्रामुख्याने कच्चे कैदी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहेत. सात ते आठ वर्षे खटले सुरू होत नसल्याने कैद्यांना कारागृहात राहावे लागते.
कारागृहातील संबंधित कच्च्या कैद्यावर ज्या कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या कलमाच्या अनुषंगाने देण्यात येणारी शिक्षा गृहीत धरण्यात यावी. अशा प्रकाराच्या शिक्षेच्या अर्धी शिक्षा एखाद्या कैद्याने उपभोगली असेल तर त्यास जामिनावर सोडण्यात यावे अशी विनंतीही करण्यात आली. कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत तोकडी असून काही दुर्घटना घडल्यास कैदी फरार होऊ शकतात. याप्रकरणात अधीक्षक शेकदार यांनी शपथपत्र दाखल करून माहिती सादर केली. ट्रायल न्यायालयांची संख्या वाढविण्यासंबंधी राज्याच्या विधी न्याय विभागाच्या प्रधान सचिवांनी पुढील सुनावणीप्रसंगी शपथपत्राद्वारे सांगण्यात यावे, अशी नोटीस हायकोर्टाने त्यांना बजावली आहे. शासनाच्या वतीने अॅड. पी. पी. मोरे यांनी काम पाहिले.
डिसेंबरअखेरीस होईल स्थलांतर
जालनायेथील कारागृहाचे काम पूर्ण झाले असून इमारत डिसेंबर रोजी तयार करण्यात आली आहे. या इमारतीची क्षमता ४८० कैदी ठेवण्याची आहे. त्यामुळे आैरंगाबाद कारागृहातील तीनशे ते चारशे कैदी जालना येथे स्थलांतरित करण्यात येतील. नाशिक येथील कारागृहात दोनशे कैदी स्थलांतरित करण्यात येतील, असे शेकदार यांनी शपथपत्रात नमूद केले. स्थलांतराची प्रक्रिया डिसेंबरअखेरीस करण्यात येईल.