आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई, नातवांच्‍या स्‍पर्शाने कैद्यांच्‍या डोळ्यात पाणी, गळाभेट उपक्रमांतर्गत जीवलग नातलगांशी भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कैद्यांसाठी कैदेतील प्रत्येक दिवस स्वातंत्र्य आणि नात्याचे महत्त्व पटवून देणारा असतो. घरातील चिमुकली कायम डोळ्यांसमोर फिरत असतात. त्यांच्या एका स्पर्शासाठी जीव आतुर होतो. शनिवारी हर्सूल कारागृहातील ७३ कैद्यांची ही आतुरता संपली आणि घरातील चिमुकल्यांची गळाभेट घेण्याची संधी त्यांना मिळाली. आसवे, आनंद आणि भावनांची घालमेल पाहून खाकीतील अधिकाऱ्यांसह हर्सूलमधील भिंतीचेही मन जणू हेलावले.
 
अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील तुरुंगात गळाभेट हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत १६ ते २० वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना कारागृहातील नातेवाइकांना भेटता येते. शनिवारी जन्मठेपेच्या ७३ कैद्यांनी आपल्या पाल्यांची भेट घेतली.

आज आईला पाणी पाजले
आज हाताने आईला पाणी पाजले आणि मनावरचे ओझे हलके झाले. बोलता बोलता पहाडासारखे धिप्पाड संजय पारोडे लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडत होते. ते मूळचे शेगावचे. १३ वर्षांपासून शिक्षा भोगत आहेत. शनिवारी आई व भाची भेटण्यासाठी आले होते.

पुढील स्‍लाइडवर...नातवांना गळ्याशी लावत अश्रूंना वाट केली मोकळी
 
 
बातम्या आणखी आहेत...