आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् पुन्हा माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - २८ जुलै २००२ ची रात्र. टाटा कंपनीने एका परदेशी कंपनीला टेकओव्हर केल्याप्रीत्यर्थ पुण्यात पार्टी दिली. या कामात माझा महत्त्वाचा वाटा असल्याने मलाही निमंत्रण होते. आनंदाच्या भरात नाचत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मी कोसळलो. त्या घटनेने माझे जीवन गोठवून टाकले होते. २० जुलै २०१६ रोजी एका अज्ञात दात्याचे हृदय माझ्या शरीरात धडधडू लागले अन्् पुन्हा आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघालो, पण २००२ ते २०१६ पर्यंतचे माझे जगणे एकाकी होते. मात्र, नव्या हृदयाने मला आयुष्यातील प्रत्येक श्वासाचे महत्त्व कळाले आहे, असे शहरातील पहिले हृदय प्रत्यारोपण झालेले अॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
जागतिक हृदय दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी जुने ते नव्या हृदयाचा प्रवास उलगडला. तो थोडक्यात असा. २८ जुलै २००२ रोजी पुण्यातील पार्टीत अस्वस्थ वाटू लागल्याने वाडिया रुग्णालयात दाखल झालो. दोन दिवसांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणारी मुख्य वाहिनी पूर्णपणे निकामी झाल्याचे कळाले. पुढे तीन वर्षे पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत वाऱ्या झाल्या. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवतांचा सल्ला घेतला. दरम्यान, वकिली सुरू करून मुंबई, दिल्लीला अशिलांची बाजू मांडण्यासाठी जाऊ लागलो. व्यवसायात यश असले तरी तंदुरुस्त हृदयाचे समाधान नव्हते.
इथूनलागले वेगळे वळण : २२ऑक्टोबर २०१५ रोजी मुंबईतून परतल्यावर मला प्रचंड त्रास सुरू झाल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झालो. हृदय फक्त १२ टक्के काम करत असून फुप्फुस, यकृत, किडनी निकामी होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात आले. डॉक्टर म्हणाले, हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पण जोखमीचा, खर्चिक पर्याय आहे. डॉ. भागवतांनी धीर देत चेन्नईत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्यानुसार मे २०१६ ला मी चेन्नईला निघालो.
हताशहोऊ नका : शस्त्रक्रियेसाठीमला २० लाखांचा खर्च आला. तो स्वयंसेवी संस्था, सरकारी योजनांतून कमी करता येतो, पण त्यावेळी ते माझ्या लक्षात आले नाही. सध्या हृदय प्रत्यारोपण आणि त्यानंतर सामान्य जीवन सहज शक्य आहे. मी त्याचे जिवंत उदाहरण आहे.

येसब फिल्मी है : प्रत्यारोपणातहळव्या माणसाचे हृदय खंबीर माणसाला बसवले तर तो हळवा होतो, असे टीव्ही, चित्रपटात तसे दाखवले जाते. पण भावनांचा संबंध मेंदूशी आहे. हृदय प्रत्यारोपणाने कोणतेही भावनिक बदल होत नाही, असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
तीनरुग्णालयात हालचाली : दरम्यान,जानेवारी २०१६ ला शहरात अवयवदान यशस्वी झाल्यावर सिग्मा, बजाज आणि एका खासगी रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपणासाठी परवानगी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शस्त्रक्रियेचा खर्च कमीत कमी होण्यासाठी बजाजमध्ये प्रयत्न सुरू आहेत. गरजूंना रुग्णालय सर्वतोपरी मदत करेल, असे बजाजचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी यांनी सांगितले.

चेन्नईत हृदय उपलब्ध होईपर्यंत राहावे लागणार होते. फोर्टिस मल्हार रुग्णालयात ११० यशस्वी प्रत्यारोपण केलेल्या डॉ. बालकृष्णन यांनी तपासले. जून महिन्यात सकाळी ११ वाजता तुम्ही तयार राहा, असा निरोप आला, पण १२ वाजता हे हृदय तुम्हाला चालणार नाही, असा निरोप आला. आम्ही हताश होऊन वाट पाहू लागलो. अखेर २० जुलै २०१६ ला मला मॅच होणारे एका अज्ञाताचे हृदय मिळाले. शासकीय रुग्णालयानेही फोन केला तुमच्यासाठीचे हृदय नक्की तुम्हालाच दिले जातेय ना, अशी खात्री त्यांनी करून घेतली. प्रत्यारोपण यशस्वी झाले. दिवसांत मी उठून उभा राहिलो.
बातम्या आणखी आहेत...