आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्तिसंग्राम स्मारकाची डेडलाइन टळण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तगादा लावून शेवटी सुरू झालेले मुक्तिसंग्राम स्मारकाचे काम आता वेग घेत असले तरी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना
अपेक्षित असणाऱ्या २३ जानेवारीपर्यंत ते पूर्ण होण्याची सूतराम शक्यता नाही. परिणामी निवडणुकीत त्याचा वापर करून घेण्याचे शिवसेनेचे मनसुबे धुळीला मिळण्याचीच
शक्यता आहे.
२००९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी स्वत: औरंगाबादेत मुक्तिसंग्राम संग्रहालय स्मारकाची उभारणी करण्याची घोषणा केली होती. नंतर सत्तेत आल्यावर तब्बल तीन
वर्षे त्यावर काहीच हालचाल झाली नाही. ठाकरे यांना स्थानिक नेत्यांच्या क्षमतेबाबत खात्री नसल्याने आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे या कामाचा जिम्मा सोपवला
आहे. देसाई यांनी गेल्या महिन्यात कामाची माहिती घेऊन सूचना केल्या होत्या. त्यानुसार संग्रहालयाच्या कामाला वेग आला आहे.
काल याबाबत मनपात कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सल्लागार समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर आज समितीचे सदस्य सारंग टाकळकर, प्रा. डाॅ. शरद
अदवंत सुरेश कुलकर्णी यांनी कामाची पाहणी केली. या संग्रहालयाच्या दर्शनी भागावर तसेच बाहेरच्या बाजूंना लावण्यात येणाऱ्या १२ पैकी सहा म्यूरल्सची पाहणी करीत
कोणती कोठे असावीत यावर संबंधितांना सूचना केल्या. या वेळी उपअभियंता के. आर. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
मुक्तिसंग्राम स्मारकाच्या कामाची सल्लागार समितीच्या सदस्यांनी गुरुवारी पाहणी केली.