आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एचडीएफसीने अखेर दोन लाखांचे शुल्क केले माफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाते बंद करण्यासाठी तब्बल 2 लाख रुपये मागणार्‍या एचडीएफसी बँकेने अखेर ग्राहकाच्या लढय़ापुढे सपशेल शरणागती पत्करली. फोरक्लोजर चाज्रेसपोटी बँकेने लावलेली ही रक्कम दहापट कमी करत 20 हजार रुपयांवर आणली. व्यापार्‍याची तारण ठेवलेली मालमत्तेची कागदपत्रेही बँकेने परत केली आहेत. यामुळे चार महिन्यांपासून सुरू असलेला व्यापार्‍याचा त्रास संपला. डीबी स्टारच्या दणक्यामुळेच बँकेला नमते घ्यावे लागले, असे व्यापार्‍याने सांगितले.
स्विस बँकेप्रमाणेच एचडीएफसी बँकेने दररोज पैसे जमा करणार्‍या व्यापार्‍याला डिपॉझिट चार्जेस लावण्याचा प्रताप केला. जुना मोंढा येथील व्यावसायिक सुरेंद्र कोठारी यांच्याकडे तब्बल 32 कंपन्यांची डिस्ट्रिब्युटरशिप आहे. दररोजची किमान 5 लाख याप्रमाणे वर्षाकाठी 8 ते 10 कोटी रुपयांची त्यांची उलाढाल आहे.
राजस्थान प्रोव्हिजन्स आणि र्शीसाई एजन्सीज या नावावर त्यांनी 15 मार्च 2009 पासून एचडीएफसी बँकेच्या निराला बाजार शाखेत करंट अकाउंट उघडले. त्यांनी 35 लाखांची कॅश क्रेडिट लिमिट घेतली. दररोज बँकेत पैसे जमा करून बँकेची पत वाढवण्यार्‍या कोठारी यांना बँकेने जून 2011 पासून दररोज जमा केल्या जाणार्‍या पैशांवरही शुल्क लावण्यास सुरुवात केली. या शुल्कापायी त्यांनी सहा महिन्यांत 80 हजार भरले आहेत.
याबाबत बँकेच्या रिड्रेसल समितीकडे तक्रार केली असता 37 हजार रुपये त्यांच्या खात्यावर वळते करण्यात आले. या व्यवहाराने त्रस्त होत त्यांनी खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी बँकेने राजस्थान प्रोव्हिजन्सवर 1 लाख 54 हजार 350 रुपये, तर र्शीसाई एजन्सीवर 44 हजार 100 रुपये असे दोन्ही खात्यांचे मिळून 1 लाख 98 हजार 450 रुपये फ ोरक्लोजिंग चाज्रेस लावले.
हे पैसे भरल्याशिवाय त्यांना खाते बंद करता येणार नव्हते. एचडीएफसीकडून मालमत्तेची कागदपत्रे आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय त्यांना दुसर्‍या बँकेत खाते उघडता येत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. बँकेकडून दाद न मिळाल्याने कोठारी यांनी डीबी स्टारकडे दाद मागितली. त्यांच्या समस्येचा अभ्यास करून डीबी स्टारने 21 एप्रिल 2012 रोजी खाते ‘बंद करायचे तर दोन लाख भरा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून या समस्येला वाचा फोडली होती.
असा झाला परिणाम - या वृत्तानंतर कोठारी यांना उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील शेकडो लोकांनी त्यांच्या लढय़ात पाठीशी असल्याचे सांगितले. बँकेची पोलखोल केल्याबद्दल कंटाळलेल्या अनेक ग्राहकांनी डीबी स्टारला धन्यवाद दिले. यामुळे क ोठारी यांना नैतिक बळ मिळाले. त्यांना बँकेने चर्चेसाठी बोलावले आणि हे प्रकरण प्रसारमाध्यमांपर्यंत नेल्याबद्दल तीव्र नापंसती दर्शवली. या काळात क ोठारी यांनी रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे ही बाब कळवली. या वृत्ताचा परिणाम होत शनिवारी 2 जून रोजी बँकेने त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे परत केली. तसेच फ ोरक्लोजिंग चाज्रेसची रक्कम दोन लाखांवरून 20 हजारांवर आणली. यामुळे क ोठारी यांना त्यांच्या दुकानाजवळ असणार्‍या वैजापूर र्मचंट बँकेत करंट अकाउंट उघडणे शक्य झाले.
संकटात मिळाली साथ - अशी पत्रकारिता मी कोठेही बघितलेली नाही. संकटात असताना डीबी स्टारने साथ दिली. अत्यंत नि:स्पृहपणे डीबी स्टारने माझ्या निमित्ताने तमाम व्यापारी वर्गाचेच दुखणे मांडले. यामुळे नैतिक बळ मिळाले. जाहिरातदारांचे आणि ओळखीच्या लोकांचे हितसंबंध बाजूला ठेवून डीबी स्टारने माझा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. अखेर डीबी स्टारच्या दणक्यापुढे बँकेने शरणागती पत्करली आणि अवास्तव दोन लाख रुपयांची मागणी मागे घेतली. माझी तारण ठेवलेली कागदपत्रे परत दिली. यामुळे सर्वच व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. सुरेंद्र कोठारी,व्यावसायिक