आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूच्या दारात उभा राहून तो करत होता जगण्यासाठी मदतीची याचना, वाचा काय घडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत नरेंद्र सिंग - Divya Marathi
मृत नरेंद्र सिंग
मृत्यूच्या दारात उभा राहून तो जगण्यासाठी मदतीची याचना करत होता. विव्हळत होता. त्याच्या किंकाळ्या रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या अनेकांच्या कानावर जाऊन धडकत होत्या. काही जण त्याचे तडफडणे उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मात्र, नको पोलिसांच्या चौकशीची कटकट असे म्हणत एकही जण त्याला दवाखान्यात नेण्यास तयार झाला नाही. केवळ २० मिनिटे अगोदर जर त्याला मदत मिळाली असती तर कदाचित तो वाचला असता, अशा शब्दांत प्रफुल्ल सिंगने त्याच्या भावाच्या मृत्यूची करुण कहाणी सांगितली. शहरात नेहमीच अपघात घडतात. त्या वेळी जखमींच्या मदतीसाठी लोक पुढे आले तर एका महिन्यात किमान जणांचे प्राण वाचू शकतात, असेही समोर आले आहे. सोमवारी (४ जुलै) आंबेडकर चौकाजवळील सनी सेंटर समोर एका १६ वर्षाच्या मुलाने भरधाव वेगाने येत प्रफुल्लचा भाऊ नरेंद्रच्या (२६, रा. जयहिंद कॉलनी, पिसादेवी) दुचाकीला धडक दिली. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आंबेडकर चौक ते सनी सेंटर वर्दळीचा रस्ता आहे. एका बाजूने मोठी वसाहतही आहे. तासभर नरेंद्र जखमी अवस्थेत का पडून राहिला. त्याच्या मदतीला कोणी धावून का आले नाही. नेमकी घटना कशी घडली, याची माहिती मिळवण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधींनी नरेंद्रचा भाऊ प्रफुल्लची भेट घेतली. तेव्हा त्याने अश्रू आवरत सांगितले की, सात वाजेच्या मला ही घटना कळली. मी धावतच घटनास्थळी पोहचलो. लोक त्याच्याभोवती कोंडाळा करून उभे होते. त्यांना हटवून मी रिक्षावाल्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही थांबण्यास तयार नव्हते. अखेर एका रिक्षासमोर जाऊनच उभा राहिलो. त्याला घाटीत नेण्यात आले. पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. बुधवारी त्याच्या अस्थींचे विसर्जन केले. पण त्या घटनेनंतर डोक्यात केवळ ‘आपल्या भावाला जर वेळी मदत मिळाली असती तर हा प्रसंग आपल्यावर आला नसता.’ एवढाच विचार आहे.
पुढे वाचा...
> नुकताच संसार सुरू झाला होता
> सीसीटीव्ही फुटेज तपासावे
> वुई व्हॉलेंटिअर्सची सेवा
> गोल्डन अवर महत्त्वाचा
> का करत नाही मदत?