आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"नो अॅक' औषधे रक्त गुठळी विरघळवण्यात परिणामकारक, बजाज रुग्णालयातर्फे आयोजित हृदयरोग परिषदेतील सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद सारख्याशहरात तिशीच्या आतील तरुण पिढीला हृदयविकार होत असल्याचे दिसू लागले आहे. रक्ताच्या गाठी तयार होण्याने हृदयरोगासोबतच ब्रेनस्ट्रोकही होतो. छातीत त्रास असलेला रुग्ण आल्यास फिजिशियनने तत्काळ "नो अॅक' औषधे द्यावीत, ज्यामुळे एंजिओप्लास्टीची गरज उद्भवणार नाही किंवा टाळता येईल, याविषयीचा ऊहापोह करणारी परिषद शनिवारी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे झाली.
कमलनयन बजाज रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त फिजिशियन असोसिएशनच्या विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कार्डिओलॉजिस्टकडे जाण्यापूर्वी रुग्णांना कुठली आैषधे द्यावीत ज्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही, यावर मार्गदर्शन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या रुग्णांवर भार होणार नाही, अशी वॉर्फरिन औषधे रक्तगाठींवर उपयुक्त आहेत. तर नो अॅकमध्ये डॅबी गॅट्रॉन, रिवो रॉक्साबॅन, अॅपेक्साबॅन, ही औषधे परिणामकारक आहेत. आतापर्यंत रुग्णांवर या औषधांचा चांगला परिनाम दिसून आला आहे. तर इडोक्साबॅन, बेट्रीक्साबॅन या औषधांचा वापर देखील होत आहे. पारंपारीक औषधी देखील चांगली असली, तरी या औषधांमुळे रुग्णला वारंवार चेकअप करावा लागत होता. असेही डॉक्टरांनी सांगितले.
जीवनशैलीमुळे तरुणांना हृदयविकार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अन्नघटकांचे निस्सारण होत नाही. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गाठींचे प्रमाण वाढते. याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. या वेळी बजाज रुग्णालयाचे डॉ. अजित भागवत, ठाण्याचे डॉ. आशिष नाबर, पुण्याचे डाॅ. शशी आपटे, डाॅ. सुनील साठे यांनी "रक्त गुठळी विरोधक औषधे' या मुद्दयांवर भाष्य केले.
रक्त गुठळी विरोधक औषधांवर आयोजित परिषदेत सहभागी झालेले डॉक्टर.

कधी अति तेल-तूप खाल्ले जाते, तर कधी पूर्णपणे टाळतात. कधी प्रचंड व्यायाम, कधी काहीच नाही असे केल्याने या व्याधी होतात. संतुलित, संयमित जीवनशैली महत्त्वाची आहे. अाधी रुग्ण नेहमीच्या डॉक्टरांकडे जातात, त्यामुळे वेळीच मार्गदर्शन हवे. डॉ.सुनील साठे
औषधांची मात्रा कमी-जास्त करत राहिल्यास औषधे परिणामकारक ठरत आहेत. ज्या रुग्णांच्या शरीराची टेंडन्सी रक्तगाठ तयार करणारी आहे, त्यांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. तेव्हा वॉर्फरिनसारखी स्वस्त औषधे रुग्णाला अार्थिकदृष्ट्या लाभदायक ठरतात. डॉ.शशिकांत आपटे
परिषदेत डॉक्टरांना रक्त गुठळी विरोधक औषधांच्या वापराविषयी जागृत करण्यात आले. रक्त पातळ ठेवणारी ते नवी आैषधे आली आहेत, त्यांना नो अॅक म्हणतात. या औषधांना निरीक्षण करण्याची गरज लागत नाही. याची किंमत सध्याच्या घडीला अधिक आहे. डॉ.आशिष नाबर