आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा, नाव्हा येथील आरोग्य केंद्राच्या उद‌्घाटनाला मुहूर्त मिळेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जालना तालुक्यातील नाव्हा येथे परिसरातील १५ गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी ४५ लक्ष रूपयांना निधी खर्चून शासनाने आरोग्य केंद्राची इमारत उभी केली आहे. याचे काम पूर्ण झाले असून उदघाटनाची प्रतीक्षा लागुन आहे.

जालना तालुक्यातील नाव्हा परिसरातील जवळपास २० गावांचा कारभार नाव्हा या गावात आहे. या ठिकाणी बाजारपेठ असल्याने आठवडी बाजार या ठिकाणी भरतो. या बरोबरच इतर धान्य खरेदी विक्रीचाही मोठ्या प्रमाणात व्यवहार होतो. या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांची मोठी संख्या असल्याने आरोग्य तसेच इतर सूविधांचाही येेथेच लाभ मिळावा अशी मागणी ग्रामस्थांची होती. या ठिकाणी येणाऱ्यांना थेट जालन्यातील शासकीय रुग्णालयात यावे लागते. जवळपास आठ ते दहा किलामीटर लांब यावे लागत असल्याने अनेकदा अडचणी येत असल्याने नागरिकांची याच ठिकाणी आरोग्य सेवा मिळाव्यात अशी मागणी होती. ही मागणी लक्षात घेता नाव्हा येथे ४५ लाखांचा निधी खर्चून इमारत तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सर्व खोल्यांत विद्युत उपकरणे जोडण्यात आली असून इतर सूविधाही देण्यात आली आहे.तसेच दारे खिडक्या ही जोडल्या असून पाण्याची अंतर्गत जोडणीही देण्यात आली आहे. याचे काम पूर्ण होवुन जवळपास १५ महिणे झाले असून खिडक्यांच्या काचा तसेच पाण्याची टाकी फोडण्याचे प्रकार होत आहे. हे रुग्णालय तत्काळ सुरू केल्यास जवळपास २० गावांतील ग्रामस्थांची आरोग्याची सोय होणार आहे. हे केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान रात्री अपरात्री एखाद्या रुग्णास उपचारासाठी दवाखाण्यात न्यायचे असल्यास आठ दे दहा किमी अंतर पार करून जिल्हा सामान्य रुग्णालय गाठावे लागते. हे आरोग्य केंद्र झाल्यास वेळेत रुग्णांवर उपचार केले जातील. शिवाय शासकीय रुग्णालयात जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यांने त्यांना आधार मिळेल.
आरोग्य केंद्र तात्काळ सुरु करून सुविधा द्या
आरोग्याची सुविधा नाव्हा गावात मिळावी ही मागणी ग्रामस्थांची हाेती. ती या माध्यमातून पूर्ण होत असून यासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीची प्रतीक्षा लागून आहे. गरिबांना या माध्यमातून आरोग्याची सुविधा त्यांच्याच गावच्या हद्दीत मिळणार आहे. यासाठी हे रुग्णालय सुरू होणे महत्त्वाचे आहे. हे तत्काळ सुरू करावेत.
-अंकुश पाचफुले, उपसरपंच नाव्हा.
बातम्या आणखी आहेत...