आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच हजार पोलिसांची केली आरोग्य तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शारीरिक मानसिक थकवा घालवण्यासाठी बरेच जण वीकेंडला हिल स्टेशन सहलीला जाऊन येतात. मात्र शहरातील एक डॉक्टर कुटुंब असे आहे, जे वीकेंडला मोफत रुग्णसेवा देतात. या कार्यात त्यांच्या पत्नीसह पाच ते सहा डॉक्टर मित्रांची टीम असते. गेल्या ३३ वर्षांपासून ही सेवा ते देत आहेत.
डॉ. नितीन संचेती हे विद्यानगरात राहतात. जवाहर कॉलनीत त्यांचे क्लिनिक आहे. ते मूळचे विदर्भातील लोणार गावचे. एमडी पदवीनंतर त्यांनी ३३ वर्षांपूर्वी शहरात प्रॅक्टिस सुरू केली. त्यांचे ८१ वर्षीय वडील विजयकुमार संचेती हेदेखील होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत. ते उज्जैनला राहतात. गेल्या पन्नास वर्षांपासून त्यांनी मोफत रुग्णसेवेचे व्रत हाती घेतले. तोच वारसा त्यांनी मुलाला दिला.

संचेती दांपत्य
डॉ. नितीन संचेती हे खेड्यात शहराच्या विविध भागांत जाऊन मोफत सेवा देतात. देवळाई भागातील १२० गरिबांची घरे त्यांनी जणू दत्तकच घेतली आहेत. ही सर्व कुटुंबे भांडी घासण्याचे काम करतात. यात १२० महिलांसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच मोफत औषधींसह हृदयरोग, मधुमेह, सोनोग्राफी, थायरॉइड अशा सोळा प्रकारच्या महागड्या चाचण्या मोफत करून देतात.
रोजच्या धावपळीत थकल्यावरही डॉ. संचेतींना वीकेंडची प्रतीक्षा असते. कुठेतरी गावात त्यांना मोफत सेवा द्यायची असते.आठवडाभर आधी कळवल्यावर डॉ. संचेती त्यांच्या मित्राच्या साहाय्याने गावात आरोग्य शिबिर घेतात. यात आैषधींसह महागड्या चाचण्याही मोफत करून देतात. हा खर्च औषधी कंपन्या उचलून त्यांना सहकार्य करतात. आजवर त्यांनी डॉक्टर मित्रांच्या मदतीने शेकडो शिबिरे घेतली आहेत. औरंगाबाद पोलिसांसाठी चार वर्षांपूर्वी मोफत आरोग्य शिबिर घेऊन अडीच हजार पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करून औषधी वैद्यकीय चाचण्या करून दिल्या. रांजणगाव शेणपुंजी येथे १९७२ रुग्णांची मोफत तपासणी अन् वैद्यकीय चाचण्या याच पद्धतीने करून दिल्या.

बातम्या आणखी आहेत...