आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Department Failed To Stopped Mortality Rate

अर्भक, बालमृत्यू रोखण्यात आरोग्य विभाग अपयशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पूरक पोषण आहार आणि आरोग्य सेवासुविधांच्या अभावामुळे वर्षभरात जिल्हा ग्रामीण आणि महापालिका क्षेत्रात ३५४ अर्भके, १७९ बाल आणि ७२२ नवजात शिशू अशा एकूण १२५५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याची नोंद जिल्हा परिषद आरोग्य विभाग महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंदणी विभागाकडून घेण्यात आली आहे. ही आकडेवारी बघता आरोग्य विभागास बालमृत्यू रोखण्यास अपयश आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात हव्या त्या सेवासुविधा मिळत नाहीत, तर खासगी औषधोपचार गरिबांना परवडणारा नाही. त्याचा थेट परिणाम गरोदर मातांच्या आरोग्यावर होत आहे. वर्षभरात जन्माअगोदर मृत्यू, जन्मल्याबरोबर आणि जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. मनपाच्या नोंदीनुसार एप्रिल १५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत २५ हजार २६५ मुले, २२ हजार ९४९ मुली असे दोन्ही मिळून ४८ हजार २१४ मुले-मुली जन्माला आलेत. त्यापैकी हजार ७७२ मुले हजार ४१० मुली एकूण ११ हजार १७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवजात शिशूंच्या मृत्युदरात वाढ होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यानुसार वर्षभरात जिल्हा ग्रामीणमध्ये २५२, तर शहरात ४७० असे मिळून ७२२ शिशूंना मृत्यूने कवटाळले .

पंतप्रधानांकडून चिंता, यंत्रणा बळकट कधी होणार?
२७ ऑगस्ट २०१५ रोजी दिल्ली येथे पहिल्यांदाच ग्लोबल कॉल टू अॅक्शन संमेलन घेण्यात आले. संमेलनात २४ देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रसूतीच्या काळात माता आणि शिशूच्या मृत्यूवर पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. हे मृत्यू रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्याकरिता माता शिशू मृत्युदरात घट होण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी देशात आरोग्य सेवेची एक बळकट यंत्रणा उभी करण्याची गरज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त करून आधुनिक चिकित्सा सेवांचा लाभ वंचितांनादेखील मिळेल, अशी यंत्रणा सक्षम केली जाणार असल्याचे सांगितले. त्याची अंमलबजावणी शहर ग्रामीण भागात होणे आवश्यक आहे.

ही आहेत कारणे
कमी वयात विवाह, महिला कुपोषित असणे, नवजात शिशूचे वजन कमी, घरगुती उपचार, गरोदर मातांनी पोषण आहाराचे सेवन करणे, अत्यावश्यक औषधी उपचार घेणे, योग्य व्यायामाचा अभाव, न्युमोनिया, मलेरिया, डायरियासारख्या आजारांचा फैलाव, वातावरणातील अनपेक्षित वेगाने होणारे बदल, खासगी सेवा महाग आणि शासकीय आरोग्य सेवेत गुणवत्ताआणि वागणुकीचा अभाव, आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष यांसारख्या विविध करणांमुळे अर्भक, शिशू बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यास अपयश येत आहे. याकडे सरकारने सर्वप्रथम लक्ष देण्याची गरज आहे.

जि.प. ग्रामीण विभाग
जिह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, २७९ उपकेंद्रे, नागरी रुग्णालये असून याद्वारे ग्रामीण भागात आरोग्यसेवा देण्यात येते. गरोदर मातांच्या कुटुंबीयांकडून योग्य आणि वेळेवर काळजी घेतल्यास अर्भक, शिशू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. डॉ.डी. बी. घोलप, वैद्यकीयअधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग.
पुढे पाहा महापालिका क्षेत्र