आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पीपीपी'च्या माध्यमातून आरोग्यशास्त्र महाविद्यालये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वैद्यकीयक्षेत्रात कुशल मनुष्यबळासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी)द्वारे राज्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून पदविका ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आरोग्यशास्त्र महाविद्यालये सुरू करणार आहेत. खासगी संस्थांकडून त्यासाठी लवकरच प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. मेडिकल टुरिझमपासून ते हेल्थकेअर मॅनेजमेंट असे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांतून हेल्थइंडस्ट्रीला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. सुविधा तसेच अटी शर्तींची पूर्तता करणा-या संस्थांशी सामंजस्य करार केला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे अभ्यासक्रम
आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे मानांकन असलेले अभ्यासक्रम बनविले जातील. हेल्थ इंडस्ट्रीला इतर सेवा पुरविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार होईल.
डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

सेवा क्षेत्राला फायदा
औषधनिर्माण क्षेत्रासह वैद्यकीय व्यवसाय वेगाने विस्तारत असल्याने मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. सेवा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण होत नसल्याने या अभ्यासक्रमांचा फायदा होईल.
डॉ. काशीनाथ गरकळ, कुलसचिव

असे असतील अभ्यासक्रम
कुशलमनुष्यबळासाठी हेल्थकेअर मॅनेजमेंट, मेडिकल टुरिझममध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर, सुपर स्पेशालिटी प्रमाणपत्र आणि फेलोशिप प्रमाणपत्र या पध्दतीचे अभ्यासक्रम असतील.