आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाचे हृदय मिळाले गरीब शेतकऱ्याला; तो म्हणाला- मी ईश्वर पाहिला नाही डॉक्टरच माझा देव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- माझे वय अवघे पंचेचाळीस, पण पाच वर्षापूर्वी बायपास शस्त्रक्रीया झाली.शेतीत फार काही पिकत नसल्याने ट्रक,ट्रॅक्टर चालवण्याची कामे केली. आरोग्याकडे फार लक्ष देता आले नाही. शेवटी हृदय निकामीच झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मी गरीब असलो तरी पण आज खऱ्या अर्थाने आज श्रीमंत झालो मी इश्वर पाहिला नाही माझ्यासाठी डॉ.उमेष टाकळकर हेच देव आहेत.
 
वर्षभर आराम केल्यावर पुन्हा शेतात काम करुन नवे पिक घेईन पण पुढे स्वत:ला जपेन...या उत्स्फुर्त भावना खास दिव्य मराठशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. नवीन हृदय मिळालेले शेतकरी श्रीमंत थोरात यांनी.
 
औरंगाबाद शहरातील सिग्मा रुग्णालयातील दहा डॉक्टरांच्या टिमने मराठवाड्यातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण केले. तेही मोफत. कारण एका गरीब शेतकऱ्याची ही शस्त्रक्रीया होती पंचवीस लाख रुपये ऐवढा खर्च रुग्णालयाने केला.
 
आज बुधवारी दि.१२ रोजी आपले नवे कोरे हृदय घेऊन शेतकरी श्रीमंत थोरात घरी गेले. त्यांना तब्बल दोन महिन्यांच्या उपचारानंतर डिश्चार्ज मिळाला. श्रीमंत थोरात यांच्या नातेवाईकांनी पेढे वाटून आनंदाश्रृंना वाट मोकळी करुन दिली. यावेळी सिग्मा रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उमेष टाकळकर, हृदय रोग तज्ञ डॉ.आनंद देवधर, डॉ मनिषा टाकळकर, डॉ आशिष देशपांडे, डॉ.शिरीष देशमुख, डॉ.अजय रोटे, डॉ.राजकुमार घुमरे, भूलतज्ञ डॉ.बालाजी आसेगावकर, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ.पुष्पा कोडलीकेरी यांची उपस्थिती होती.
 
हेही हृदय माझेच वाटत आहे..
मराठवाड्यातील पहिले हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले.सिग्माच्या टिमने सामजिक बांधिलकीतून ही शस्त्रक्रीया मोफत तर केली. पांढरा शुभ्र नेहरु शर्ट- पायजामा आणि चेहऱ्यावर नवे आयुष्य मिळाल्याचे कृतार्थ भाव घेऊन अहमदनगर जिल्हयातील शेवगाव तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी श्रीमंत थोरात यांनी प्रथमच संवाद साधला. तेव्हा डॉक्टरांच्या टिमसह थोरात यांचेही डोळे पाणावले.
 
मी ईश्वर पाहिला नाही माझ्यासाठी डॉक्टर टाकळकरच देव आहेत माझे जुने हृदय खराब झाल्याचे कळले तेव्हा वाईट वाटले आता सर्व काही संपले असे वाटत असतानाच सिग्मातच मला दुसरे हृयद मिळाले.
 
गेले दोन महिने हृदय बदलल्यावर माझ्यावर मोफत उपचार सुरु होते. आता हे नवे हृदय माझेच वाटत आहे. मी आता सर्वाही खाऊ शकतो मला पूर्वी दम लागत होता. तो लागणे पूर्णपणे थांबला आहे.
 
जेवण जात नव्हते, अनेक रात्री मी झोपलो नव्हतो आता नवे हृदय बसवताच मला चांगले जेवण जात आहे. आणि झोपही पडल्या पडल्या लागते. अशा भावना श्रीमंत थोरात यांनी व्यक्त केला तेव्हा त्यांचे अश्रृ रुमालाने पुसले ते त्यांच्या पत्नी नंदाबाई थोरात यांनी. 
 
हृदयाला घडला फक्त एक मिनीटाचा प्रवास..
 
सिग्मा रुग्णालयाचे संचालक डॉ.उमेष टाकळकर म्हणाले की,शेतकरी श्रीमंत थोरात हे खूप नशिबवान ठरले त्यांना तिन हृदयांच्या ऑफर आल्या होत्या पण ती हृदये औरंगाबादच्या बाहेरील ब्रेनडेड रुग्णांची होती.पण काही तांत्रिक कारणाने ती हृदये श्रीमंतरावांच्या शरीराला मॅच झाली नाहीत. शेवटी सिग्मा रुग्णालातच एका ब्रेनडेड रुग्णाचे हृदय मॅच झाले आणि
 
मराठवाड्यातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्याची संधी मिळाली. ग्रीन कॉरिडोअरही फक्त एकच मिनीटाचा करावा लागला एका ऑपरेशन थिएटर मधून दुसऱ्या थिएटर मध्ये ते अवघ्या एक मिनीटात आले, आम्ही २५ लाख रुपये खर्च केले त्यासाठी आता सरकारकडे मुख्यमंत्री सहायता निधी,काही दानशूर व्यक्ती यांना मदतीचे आवाहन करीत आहोत.
 
आता आमच्या रुग्णालयाला हृदयासह,किडनी,लिव्हर ट्रान्सप्लान्टेशची परवानगी मिळाली आहे. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्याचे अधिकृत दवाखाना म्हणूनही मान्यता मिळाली आहे. या शस्त्रक्रीया या आधी फक्त मुंबई , दिल्ली, बंगुरुळू, चेन्नई याच शहरात झाल्या आहेत आता पाचवे शहर औरंगाबाद ठरले आहे.
 
हृदयरोगतज्ञ डॉ.देवधरांनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी..
 
हृदय प्रत्यारोपणाची महत्वाची जबाबदारी पार पाडणारे डॉ. आनंद देवधर यांनी अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ते म्हणाले, श्रीमंत थोरात यांचे हृदय निकामी झाले होते तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी दाता शोधत होतो त्यांना मुंबई,नाशिक,पुणे येथून ऑफरही आल्या होत्या पण ती हृदये मॅच झाली नाही.
 
यात दाता आणि घेणारा या दोघांची शरीर रचना,रक्तगट,वजन या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात त्यांचे मॅचिंग झाले तरच ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय घेता येते.सिग्मातील ब्रेनडेड रुग्णाचेच हृदय योगायोगाने श्रीमंत यांच्या शरीर रचनेला मॅच झाले त्यामुळे हे शक्य झाले.
 
त्यांनी सांगितलेल्या महत्वाच्या टिप्स पुढील प्रमाणे...
- हदयरोपण करताना दाता आणि घेणारा यांचे  रक्तगट, वजन,शरीर रचना मॅच व्हावी लागते
 
- चार तासांच्या अवधीतच हृदयाचे प्रत्यारोपण करावे लागते इथे फक्त एकच मिनिटांचा प्रवास घडल्याने हे हृदय खूप ताजे होते त्यात कुठलेही गुंतगुंती झाली नाही.
 
-प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेनंतर  श्रीमंत थोरात यांच्या दोन महिने सिग्मा रुग्णालयांत उपचार सुरु होते कारण हृदय शरीर स्विकारते की नाही हे चेक करावे लागते.
 
- प्रत्यारोपणानंतर थोरात यांना इन्फेक्शन झाले होते. त्यांना डायलिसिस वर ठेवावे लागले.अनेक प्रकारची गुंतागुंत झाली होती पण ती यशस्वीपणे हाताळली.
 
- नवीन हृदयाची बोयोप्सी केली.(हृदयाचा अगदी लहान तुकडा) काढून चेन्नईला तपासणी साठी पाठवला तेथून हृदय एकदम ठणठणीत व मॅच झाल्याचा रिपोर्ट आला.
 
-ही शस्त्रकीऱ्या झाल्यावर पुन्हा हृदय विकाराचा झटका येऊ शकतो त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी रुग्णाला जाऊ देऊ नये.पाणी रोज उखळून प्यावे कच्चे अन्न शिळे अन्न,खाऊ नये,तोंडाला मास्क लावावा.
 
-वर्षभर काळजी घेतली की रुग्ण शेतात देखिल काम करु शकतो.
 
-शंभरात सत्तर रुग्ण वाचण्याचा रेकार्ड या शस्त्रक्रीयेचा आहे.
 
- पाच सर्जन आणि सहा भूलतज्ञांच्या टिमने चार तासांत ही शस्त्रक्रीया केली.
मला नविन हृदयाचा पती मिळाला..
 
आमची मुल लहान आहेत शेती अगदी दिड एकर कोरडवाहू आहे अशा परिस्थीती पतीचे हृदय निकामी झालेहोते पण डॉक्टर टाकळकरांच्या रुपाने देव भेटला.आता मी खूप आनंदी आहे.पैसेच नसल्याने सर्व आर्थि भार सिग्माने उचलला त्यांचे खूप उपकार राहतील.
नंदाबाई थोरात (शेतकऱ्याची पत्नी)
 
पेढे वाटतच गावाकडे निघालो..
श्रीमंतराव माझे मोठे भाऊ आहेत आम्हा अनपढ अन गरीबाला कोण मदत करेल असे वाटत नव्हते सर्व आशा मावळल्या होत्या पण पैसा नसतानाही सर्वकाही झाले ते डॉ टाकळकरांमुळे
- मुक्ताबाई गळधर,शेतकऱ्याची बहिण
 
अवयव दानासाठी अर्जाची रिघ..
डॉ.टाकळकर म्हणाले की शहरातील मोठ्या दानशूर व्यक्तींना मी आवाहन करतो की त्यांनी गरीबांच्या अयवदानासाठी आर्थिक मदतीला पुढे यावे आम्ही मोफत रोपण करु एकही पैसा घेणार नाही.
अशा प्रकारच्या शस्त्रक्रीया सुरु झाल्यापासून आमच्या रुग्णालयात दर आठव्याला किमान सत्तर लोक अवयव दानाचा अर्ज भरुन देत आहेत.
बातम्या आणखी आहेत...