आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: एप्रिलमध्ये विक्रमी पाऊस, पाव शतकाच्या कालावधीत प्रथमच २० मि.मी.च्या वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सोमवारी सायंकाळी ५.३० ते ६.०० वाजेच्या दरम्यान बरसलेल्या पावसाने शहरात नवा विक्रम केला. या वेळी १९८९ नंतर प्रथमच एप्रिलमध्ये २० मिमी पावसाची नोंद झाल्याचे चिकलठाणा वेधशाळेच्या सू़त्रांनी सांगितले.
सोमवारी सायंकाळी पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. सोमवारचा आठवडी बाजार पावसाने उधळून लावला. तर हजारो ग्राहक, पर्यटक, वाहनचालक आणि चाकरमान्यांची पावसाने त्रेधा उडवली. सखल भागात जागोजागी तळे साचल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांचे हाल झाले. पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोमवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. शहरातील रस्ते-नाले तुडुंब भरून वाहिले. गुंठेवारीत चिखल झाला. रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालक घसरून पडले.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
वादळीवारे, पाऊस आणि गारपिटीने आंबा, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी या फळपिकांसह काढणीस आलेला भाजीपाला इतर पिके आडवी झाली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व मोसमाला बराच अवधी असताना भर उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांसह सर्वच वर्गात चिंता व्यक्त होत आहे

तापमान अंशांनी घसरले
चारदिवसांपूर्वी कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सियस इतके होते. हवामानातील बदल, अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर तापमानात अंश सेल्सियसने घट होऊन ते ३०. अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. पावसामुळे रात्रीचा उकाडा कमी झाला असला तरी दुपारी उकाडा, सकाळी आणि सायंकाळनंतर गारवा सुटत असल्याने मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.

शहर बुडाले अंधारात
पावसातमहावितरणची वीज नेहमीच गुल होते. सोमवारीही तसेच झाले. अवकाळी पावसाने हर्सूल, चिकलठाणा, मुकुंदवाडी, सिडको, बायजीपुरा आदी भागातील वीजपुरवठा खंडित होऊन हा भाग अंधारात गडप झाला. महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. प्रचार कार्यालयात शे-दोनशे कार्यकर्ते बसलेले असतात. पण वीजच नसल्याने प्रचार कार्यालये ओस पडली होती.
धुवाधार पावसामुळे नागेश्वरवाडी रस्त्याला तलावाचे स्वरूप आले. छाया : अरुण तळेकर